Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तुमच्या मोबाईल नंबरमध्ये असतील 'हे' क्रमांक तर व्हाल कंगाल अन् घरातील सदस्य होतील आजारी

तुमच्या मोबाईल नंबरमध्ये असतील 'हे' क्रमांक तर व्हाल कंगाल अन् घरातील सदस्य होतील आजारी
 
 
सध्याच्या काळात जवळपास सर्वांच्याच हातात आपल्याला मोबाईल दिसतो. मोबाईल हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. याच मोबाईलच्या माध्यमातून अनेक कामे सोपी झाली आहेत. पण मोबाईल क्रमांकातील काही अंक हे आपल्यासाठी अडचणी निर्माण करु शकतात हे तुम्हाला माहिती आहे का?. अंकशास्त्रानुसार, आपला मोबाईल नंबर, जन्मतारीख, घराचा क्रमांक, वानहनाचा नंबर यामधील अंक हे खूप महत्त्वाचे असतात. आज आपण जाणून घेऊयात मोबाईल नंबरमध्ये कोणत्या अंकाचा समावेश नसावा.

अंक ज्योतिष शास्त्रानुसार, आपल्या मोबाईल नंबरमध्ये 2,4, 8 हे क्रमांक नसावे. हे अंक आपल्या मोबाईल नंबरमध्ये असतील तर ते त्रासदायक ठरू शकतात. तसेच आयुष्यात अनेक संकटे निर्माण करु शकतात.

2 क्रमांक

अंकशास्त्रानुसार, 2 क्रमांक हा चंद्र देवाशी संबंधित आहे. असे मानले जाते की, ज्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्राची स्थिती कमकुवत आहे त्यांना शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तसेच ताप, खोकला आणि घसादुखीचा त्रास उद्भवू सकतो.

4 क्रमांक

धार्मिक मान्यतेनुसार, कुंडलीत राहूच्या कमकुवत स्थितीमुळे व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो. त्यामुळे हा क्रमांक असलेल्या व्यक्तीला पोटाच्या संबंधित समस्या उद्भवू सकतात. आर्थिक नुकसान सुद्धा होण्याची शक्यता असते. ज्या व्यक्तींच्या मोबाईल नंबरमध्ये 4 एकापेक्षा जास्त वेळा आहे त्या व्यक्तींना फोनवर बोलताना प्रचंड राग येतो.

8 क्रमांक

8 हा क्रमांक शनी देवाशी संबंधित आहे. हा अंक मोबाईल नंबरमध्ये असल्यास त्या व्यक्तीला विविध अडचणींचा सामना करावा लागू सकतो. खर्चात वाढ होते. पैसे शिल्लक राहत नाहीत. तसेच समाजात मान-सन्मान सुद्धा मिळत नाही. 

28 किंवा 82 अशी जोडी

ज्या व्यक्तींच्या मोबाईल नंबरमध्ये 28 किंवा 82 हा क्रमांक असेल तर त्यांच्या कुटुंबातील सदस्य सातत्याने आजारी पडेल. आजारपणावर मोठा खर्च होऊ शकतो.

67 किंवा 76 क्रमांक

तुमच्या मोबाईल नंबरमध्ये 67 क्रमांक किंवा 76 क्रमांक असेल तर तुमच्या जोडीदाराला आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता असते. तसेच वैवाहिक जीवन सुद्धा तणावपूर्ण राहण्याची शक्यता असते. 

(Disclaimer: हा मजकूर सामान्य माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. या माहितीचं आम्ही समर्थन करत नाही आणि ही माहिती योग्य असल्याचा दावा सुद्धा आम्ही करत नाही.)

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.