Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नवीन मोबाईलची खरेदी अन् आयुष्याचा शेवट! मित्रांनीच केला घात, पार्टी न दिल्याने तरुणाची हत्या

नवीन मोबाईलची खरेदी अन् आयुष्याचा शेवट! मित्रांनीच केला घात, पार्टी न दिल्याने तरुणाची हत्या
 

आजच्या धावपळीच्या जगात मोबाईल म्हणजे सर्वांची अत्यावश्यक वस्तू बनली आहे. लहानग्यांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच मोबाईलने आपले वेड लावले आहे. मोबाईलचा जास्त वापर केल्यास त्याचे दुष्परिणामही होतात.

दिवसेंदिवस बाजारात महागडे आणि तितकेच आकर्षित करणारे फोन येत आहेत. दिल्लीतील एका तरुणाने अशाच एका नवीन फोनची खरेदी केली पण मित्रांना पार्टी न दिल्याने त्याला आपला जीव गमवावा लागला. येथील शकरपूर मार्केटमध्ये सोमवारी सायंकाळी उशीरा एका अल्पवयीन मुलाची त्याच्या मित्रांनी हत्या केली. अल्पवयीन मुलाने मोबाईल खरेदी केल्यानंतर मित्रांना पार्टी न दिल्याने त्याची हत्या करण्यात आली. सचिन असे १६ वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे.

माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. शकरपूर पोलीस ठाण्यात खुनासह अनेक कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपींची ओळख पटली असून तेही अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत सचिन हा आपल्या कुटुंबासह शकरपूर परिसरात राहत होता. तो येथील सरकारी शाळेत नववीत शिकत होता. घटनेच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की, तिघांनी धावत जाऊन अल्पवयीन मुलावर चाकूने हल्ला केला.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अल्पवयीन मुलाने जीव वाचवण्याचा प्रयत्न केला पण गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. अल्पवयीन मुलाला आणि आपल्या मित्राला रक्तबंबाळ अवस्थेत पाहून आरोपींनी तिथून पळ काढला. स्थानिकांनी मृत अल्पवयीन मुलाला ऑटोने जवळच्या रुग्णालयात दाखल केले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन हा मोबाईल घेण्यासाठी मित्रासोबत शकरपूर मार्केटमध्ये गेला होता. खरेदी करून तो घरी परतत होता. रामजी समोसा विक्रेत्याकडे पोहोचल्यावर त्याला त्याचे आणखी तीन मित्र भेटले आणि त्यांनी पार्टीसाठी आग्रह केला. सचिनने पार्टी देण्यास नकार दिला. यावरून त्यांच्यात वादावादी झाली. मग सचिनच्या मित्रांनी त्याच्यावर चाकूने हल्ला केला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.