याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, दुधारे कुटुंब हे गेल्या अनेक दिवसांपासून शेतात राहत होते. रात्री सर्व कामे आटपून मुलगी पल्लवीने तिच्या आईच्या हातावर मेहंदी काढली आणि सर्वजण झोपी गेले. मात्र सकाळी उठल्यावर पल्लवीला तिची आई न दिसून आल्याने तिने आसपास शोध घेतला. शेवटी तरंगलेला आईचा मृतदेह विहीरीत दिसला. याच धक्क्यातून मुलीने कोणताही विचार न करता स्वतः विहिरीत उडी घेत आत्महत्या केली.
अंत्यविधीला येताना भावाचा अपघात
दरम्यान, वंदना दुधारे यांचा भाऊ बहिणीच्या अंत्यसंस्कारासाठी येत होता. त्याचा अपघात झाला. वंदना यांच्या आई-वडिलांचेही निधन झाले आहे. आता बहीण आणि भाचीच्या मृत्यूचा त्यांना धक्का बसला आहे. भाची पल्लवी आणि बहीण वंदना दुधारे यांच्या मृत्यूची माहिती मिळताच अंत्यसंस्कारासाठी ते दुचाकीवरून निघाले होते. पण कुत्रा आडवा आल्यानं त्यांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात ते जखमी झाले. रुग्णालयात उपचार घेऊन ते अंत्यसंस्कारासाठी गल्लेबोरगाव इथं आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.