Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाषण करताना काँग्रेस अध्यक्षाची तब्येत बिघडली, मंचावर कोसळले...

भाषण करताना काँग्रेस अध्यक्षाची तब्येत बिघडली, मंचावर कोसळले...
 

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांची भाषण करता करता अचानक तब्येत बिघडल्याची घटना घडली आहे.प्राथमिक माहितीनुसार भाषण करताना खरगे अचानक बेशुद्ध पडले.

त्यानंतर काही वेळाने ते खाली बसले आणि पुन्हा उभे राहून 2 मिनिटे भाषण केले. या 2 मिनिटाच्या भाषणात त्यांनी ''मी 83 वर्षांचे असून अजून मरणार नाही. मोदींना सत्तेवरून हटवल्याशिवाय मी मरणार नाही'', असे त्यांनी सांगितले. या संदर्भातला व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

जम्मू काश्मीरमध्ये सूरू असलेल्या विधानसभा निवडणुकी दरम्यान कठुआ येते एका सभेला संबोधित करताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची तब्येत बिघडली आहे. भाषण करत असताना अचानक त्यांना चक्कर आली. त्यानंतर आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांनी लगेच त्यांना सावरलं. त्यानंतर त्यांना पाणी पाजण्यात आलं. पाणी पाजल्यानंतर त्यांनी पुन्हा भाषणाला सूरूवात केली. मात्र ते जोरजोरात श्वास घेत होते आणि त्यांना दम लागल्याचेही दिसत होते. त्यानंतरही त्यांना पुन्हा अस्वस्थ वाटू लागलं आणि इतरांनी त्यांना भाषण थांबवायला सांगितलं.
यानंतर खरगे यांनी बसूनच सभेला संबोधित केले. यावेळी खरगे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. केंद्र सरकारला जम्मू काश्मीरमध्ये कधीच निवडणुका घ्यायच्या नव्हत्या. लेफ्टनंट गव्हर्नरच्या माध्यमातून रिमोटने चालणारे सरकार त्यांना हवे होते, असा आरोपही खरगे यांनी यावेळी केला. तसेच मोदींनी 10 वर्षात देशातील तरूणांना काहीही दिले नाही. 10 वर्षात तुम्हाला समृद्ध करू न शकणाऱ्या व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवणार का? असा सवालही खरगे यांनी उपस्थितांना केला.

प्रत्येक वर्षी 2 कोटी नोकऱ्या देऊ. विदेशातून काळा पैसे परत आणू, प्रत्येकाच्या खात्यात 15-15 लाख टाकू ही आश्वासनं मोदींनी पूर्ण केली नाहीत. जो व्यक्ती खोटं बोलतो त्याला जनता कधीच माफ करत नाही. जम्मू काश्मीरची जनताही मोदींना कधी माफ करणार नाही, असा हल्ला देखील खरगेंनी मोदींवर चढवला. ''मी 83 वर्षांचे असून अजून मरणार नाही. मोदींना सत्तेवरून हटवल्याशिवाय मी मरणार नाही'', असे त्यांनी सांगितले. या संदर्भातला व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.