Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रंगीत खडूच्या साह्याने केले गणराय, प्रदूषण रोखण्यासाठी संदीप कदम यांनी शोधला उपाय

रंगीत खडूच्या साह्याने केले गणराय, प्रदूषण रोखण्यासाठी संदीप कदम यांनी शोधला उपाय
 

अनोखा उपक्रम-ब्रह्मानंद विद्यालयाच्या संदीप कदम सर यांनी केली चित्र गणेशाची स्थापना..
पलूस तालुक्यातील ब्रह्मानंद विद्यालय, ब्रह्मानंदनगरचे कलाशिक्षक श्री संदीप नारायण कदम सर यांनी आपल्या घरी ब्लॅकबोर्डवर रंगीत खडूच्या माध्यमातून श्री चित्रगणेश चित्रित केला आहे. ते मूळचे बुरुंगवाडी (भिलवडी) गावचे रहिवासी आहेत. पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टिक, थर्माकोल टाळले पाहिजे. त्याचबरोबर सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवासाठी बाजारात आलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिस गणेश मूर्ती व शाडू माती मूर्ती हा पर्यायी तेवढाच घातक आहे, कारण शाडू माती तयार करताना वापरलेल्या रसायनामुळे शाडू मातीचा थर सुद्धा साध्या मातीत एकरूप होत नाही. यासाठी गाळाची माती वापरून गणेशमूर्ती तयार करणे हा पर्याय योग्य आहे.
 
परंतु संदीप कदम सर यांनी आपल्या घरी काळ्या फळ्यावर रंगीत खडूच्या माध्यमातून श्री चित्रगणेश चित्रीत केला आहे. यासाठी त्यांनी सलग नऊ तास फलक लेखन करून चित्र साकारले. रंगीत खडूमुळे कोणतीही नुकसान होत नाही शंभर टक्के प्रदूषण मुक्त गणरायाची निर्मिती करून आपल्या घरी स्थापना केली आहे.
     
गणेश चित्रकृतीतून श्री गणेशावरील श्रद्धा आणि विश्वासाबरोबरच पर्यावरणाचा संदेश तसेच कलाप्रसारही करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे एक वेगळा मार्ग त्यांनी गणेश भाविकासाठी दाखवला आहे. आपणही आपल्या घरी फलकावर असे चित्रण करून जर श्री गणेशाची स्थापना केली, तर पर्यावरण सांभाळण्यासाठी प्रत्येकाची मदत होईल. असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान फलकावर श्री गणेशाची आकृती साकारून त्याची पूजा करण्याचा अनोखा उपक्रम असून त्याचे कौतुक होत आहे इतरांनी ही असा उपक्रम राबवावा.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.