Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

७ वी पास उमेदवारांसाठी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी ! 'या' बँकेत निघाली पद भरती, कुठं करणार अर्ज? वाचा सविस्तर

७ वी पास उमेदवारांसाठी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी ! 'या' बँकेत निघाली पद भरती, कुठं करणार अर्ज? वाचा सविस्तर
 

बँकेत नोकरी करू इच्छीणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर भारतात बँकिंग एक्झामसाठी लाखो तरुण-तरुणी तयारी करत आहेत. जर तुम्हीही बँकिंग एक्झाम साठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी चालून आली आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी बँकेने अधिसूचना देखील जारी केली आहे. तसेच इच्छुक उमेदवारांकडून अर्जही मागवले जात आहेत. महत्त्वाचे म्हणजे या पद भरती प्रक्रिया अंतर्गत कोणत्याही परीक्षा विना उमेदवारांची निवड केली जाणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण या पदभरतीची सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या पदांसाठी भरती होणार?

फॅकल्टी, ऑफिस असिस्टंट, अटेंडर, वॉचमॅन आणि गार्डनर या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे.

किती पदांसाठी भरती होणार?

फॅकल्टी पदाच्या ३ जागा, ऑफिस असिस्टंट पदाच्या ५ जागा, अटेंडर पदाच्या ३ जागा अन गार्डनर पदाची एक जागा आणि वॉचमन पदाची एक जागा भरली जाणार आहे. अर्थातच या पदभरती प्रक्रिया अंतर्गत एकूण 13 जागा भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

फॅकल्टी : मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थेतून पदवी प्राप्त उमेदवारी या पदासाठी पात्र राहणार आहेत. तसेच उमेदवाराला संगणकाचे आणि स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक राहणार आहे.

ऑफिस असिस्टंट : या पदासाठी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेमधून बीएसडब्ल्यू/बीए/ कॉम्प्युटर सायन्स पदवी प्राप्त उमेदवार पात्र राहणार आहेत. सदर उमेदवाराला एम एस ऑफिस चे ज्ञान असणे आवश्यक राहणार आहे.

वॉचमन आणि गार्डनर : या पदासाठी किमान सातवी पास उत्तीर्ण उमेदवार पात्र राहणार आहेत.

वयोमर्यादा

या भरतीसाठी 22 ते 40 वयोगटातील उमेदवार पात्र ठरणार आहेत. वयोमर्यादेत नियमानुसार सूट देखील मिळणार आहे.

पगार किती मिळणार

या पदभरती अंतर्गत फॅकल्ट पदासाठी नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना ३०,००० रुपये, ऑफिस असिस्टंट पदासाठी २०,००० रुपये, अटेंडर पदासाठी १४,००० रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.

अर्ज कसा करावा लागणार?

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. centralbankofinidia.co.in या संकेतस्थळावर इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज सादर करता येणार आहे.

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून 15 सप्टेंबर 2024 पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.