शरद पवारांशेजारची खुर्ची राहुल गांधींनी नाकारली कारण...
सांगलीत दिवंगत काँग्रेस नेते डॉ. पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि स्मारक लोकार्पण काँग्रेस नेते, खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते करण्यात आलं.
यावेळी मंचावर सुशीलकुमार शिंदे, शरद पवार उपस्थित होते. तिथे राहुल गांधींच्या ताफ्यातील सुरक्षारक्षकांनी त्यांना पवारांशेजारची खुर्ची ऑफर केली. पण राहुल गांधींनी ती खुर्ची नाकारली अन् काँग्रेस अध्यक्ष खर्गेंना ऑफर केली. आणि स्वत: खर्गेंशेजारील खुर्चीवर बसणं पसंत केलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.