उद्धव ठाकरे गटाची मुंबईतील संभाव्य उमेदवार यादी समोर; नवीन चेहऱ्यांना संधी
मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सगळ्याच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्यात मनसेने निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच उमेदवारांची घोषणा केली आहे. आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडूनही संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. त्यात आदित्य ठाकरे पुन्हा एकदा वरळीतूनच निवडणुकीला उभे राहण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या काही मतदारसंघातील उमेदवारांची ही यादी आहे.
खालील उमेदवारांची संभाव्य यादी
आदित्य ठाकरे - वरळीतेजस्विनी घोसाळकर - दहिसरवरूण सरदेसाई - वांद्रे पूर्वसुनील प्रभू - दिंडोशीसुनील राऊत - विक्रोळीऋतुजा लटके - अंधेरी पूर्वसंजय पोतनीस - कलिनाप्रविणा मोरजकर - कुर्लाश्रद्धा जाधव - वडाळाअमोल किर्तीकर - जोगेश्वरीनिरव बारोट - चारकोपसमीर देसाई - गोरेगावरमेश कोरगांवकर - भांडूपईश्वर तायडे - चांदिवलीसचिन अहिर किंवा विशाखा राऊत - दादर माहिमप्रकाश फातर्पेकर - चेंबूर
महाविकास आघाडीत मुंबईच्या ३६ जागांसाठी आतापर्यंत २ बैठका पार पडल्या आहेत. त्यात ठाकरे गटाला सर्वाधिक जागा मिळतील असं बोललं जात आहे. ठाकरे गटाने २०-२२ जागांसाठी आग्रह धरला आहे. त्यात जे विद्यमान आमदार ठाकरे गटासोबत आहेत त्यांना पुन्हा एकदा २०२४ च्या निवडणुकीत उतरवलं जाईल. त्याशिवाय नवोदित चेहऱ्यांनाही संधी दिली जाणार आहे. काही जागांवर २-३ जणांच्या नावाची चर्चा आहे. मुंबईतील ६ लोकसभा जागांपैकी अरविंद सावंत, अनिल देसाई आणि संजय पाटील यांच्या रुपाने ३ खासदार ठाकरे गटाचे निवडून आलेत. त्यामुळे मुंबईतील ३६ पैकी सर्वाधिक जागा लढवण्यावर ठाकरे गटाचा भर आहे. सध्या महाविकास आघाडीत मुंबईतील जागांबाबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे समोर आलेली ही यादी संभाव्य असून त्यात येत्या काळात काही बदलही अपेक्षित आहेत. सूत्रांच्या हवाल्याने टीव्ही ९ मराठीनं ही बातमी दिली आहे.
मुंबई, ठाणे या भागात जास्तीत जास्त लढवण्यावर ठाकरे गटाचा भर आहे. कारण याठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या संघटनेची ताकद आहे. मोठ्या संख्येने मतदान ठाकरेंसोबत आहे त्यामुळे या भागात अधिक आमदार निवडून आणण्यासाठी ठाकरे गटाचे प्रयत्न आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका निवडणुकाही तोंडावर आहेत. त्यामुळे मुंबई, ठाणे महापालिकेत सत्ता आणण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.