'कर्मवीरभूषण' पुरस्कार रविवारी वितरण सोहळा
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त कर्मवीर नागरी सहकारी पतसंस्था व कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना 'कर्मवीर कृषीभूषण', प्राचार्य डॉ. डी. डी. चौगुले यांना 'कर्मवीर विद्याभूषण', तर योगेश राजहंस यांना 'कर्मवीर उद्योगभूषण' पुरस्कार देण्यात येणार आहे, अशी माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कर्मवीरभूषण पुरस्कार वितरण सोहळा रविवारी दुपारी ३ वाजता ऐश्वर्य मल्टिपर्पज हॉल ए. बी. पाटील इंग्लिश स्कूलजवळ इनामधामणी येथे होणार आहे. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्याहस्ते व भारती अभिमत विद्यापीठाचे कुलपती प्राचार्य डॉ. शिवाजीराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होणार आहे. बीएआरसीच्या टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर अॅण्ड कोलॅबरेशनचे माजी प्रमुख डॉ. अजित पाटणकर यांची विशेष उपस्थिती आहे. मानचिन्ह व रोख ५१ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती रावसाहेब पाटील यांनी दिली.
पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमस्थळी अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मॉडेलचे प्रदर्शनही होणार आहे. डॉ. शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी संशोधित केलेल्या औषधांचेही प्रदर्शन होणार आहे. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर हे या प्रदर्शनाला भेट देणार आहेत. या कार्यक्रमासाठी शाळा,महाविद्यालयांनी सहभाग नोंदवावा असे आवाहनही पाटील यांनी केले.
कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यवाह लालासाहेब थोटे, पतसंस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अशोक सकळे, संचालक अॅड. एस. पी. मगदूम, डॉ. रमेश ढबू, वसंतराव नवले, डॉ. एस. बी. पाटील, डॉ. चेतन पाटील, संचालिका भारती चोपडे, चंदन केटकाळे, डॉ. नरेंद्र खाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल मगदूम यावेळी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.