महिला खासदाराची कर्मचाऱ्यावर सेक्ससाठी जबरदस्ती; कारमध्ये संबंध ठेवल्यानं दुखापत
वॉशिंग्टन : संसदेत लैंगिक हिंसाचाराविरोधात विधेयक मांडणाऱ्याच महिला खासदारावर सहकाऱ्याला शरीरसंबंधासाठी जबरदस्ती केल्याचे गंभीर आरोप झाले आहेत. अमेरिकेच्या खासदार मॅरी एल्वराडो गिल यांच्यावर सहकाऱ्याने हे आरोप केले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल झाला आहे.
आरोप करणाऱ्या सहकाऱ्याने दावा केला की, शारीरिक संबंधांच्या मागणीमुळे मला दुखापतही झाली. दरम्यान, सहकाऱ्याने केलेले गंभीर आरोप खासदार एल्वराडो गिल यांच्या वकिलांनी फेटाळून लावले आहेत. स्काय न्यूजने दिलेल्या रिपोर्टनुसार, कॅलिफोर्नियाच्या खासदार गिल यांचे माजी चीफ ऑफ स्टाफ चॅड कॉन्डिट यांनी आरोप केले आहेत. 39 पानी तक्रारीत कॉन्डिट यांनी आरोप केला की, त्यांच्या कार्यकाळात अनेकदा शारीरिक संबंध ठेवण्यास सांगण्यात आलं. इतकंच नाही तर यासाठी महिला खासदार गिल यांनीच मला जबरदस्ती केली असाही आरोप केला आहे.
कारमध्ये संबंध ठेवल्यानं दुखापत
कॉन्डिट यांनी असा आरोप केला की शेवटी त्यांच्यावर कारमध्ये शरीर संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला गेला. त्यामुळे त्यांना तीन हर्नियेटेड डिस्क आणि पाठदुखीच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. कॉन्डिट आणि एल्वराडो गिल यांची भेट 2022 मध्ये झाली होती. त्यावेळी एल्वराडो गिल कॅलिफोर्निया असेंबलीची निवडणूक जिंकल्या होत्या. त्यानंतर त्या स्टेट सेनेटर बनल्या. तर कॉन्डिट यांना चीफ ऑफ स्टाफ बनवलं होतं.
खासगी कामे सांगितली
कॉन्डिट यांनी आरोप केला की, एल्वराडो यांनी शरीरसंबंधांसाठी दबाव टाकला. गिल यांनी मुलांना आणायला जाणं, कुत्र्याला सांभाळणं अशी खासगी कामंही सांगितली. इन्यो काउंटी दौऱ्यावेळी शारीरिक संबंध ठेवण्यास सुरुवात केल्याचं कॉन्डिट यांनी त्यांच्या आरोपात म्हटलं आहे.
नकार देताच दिला त्रास
एल्वराडो यांना जेव्हा शरीरसंबंधासाठी नकार दिला तेव्हा त्या नाराज झाल्या. त्या आक्षेपार्ह बोलायच्या. इतकंच नाही तर एचआरकडून सुनावण्यास सांगितलं होतं. एल्वराडो गिल या माझ्या घरी येऊन पत्नीसमोर माझ्यावरच गंभीर आरोप केले असंही कॉन्डिट यांनी म्हटलंय. कॉन्डिट यांना डिसेंबरमध्ये स्टेट सेनेटमधून काढून टाकल्याची नोटीस मिळाली होती. आता त्यांनी एल्वराडो यांच्यावर आरोप करत नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.