पुणे :- हॉटस्पॉट दिले नाही म्हणून कोयत्याने खून करणाऱ्या चौघेनां पकडले, तिघे अल्पवयीन निघाले.
हॉटस्पॉट मागूनही दिले नाही म्हणून ४७ वर्षीय वासुदेव कुलकर्णींचा कोयत्याने मर्डर करणाऱ्या चौघांना पोलिसांनी पकडले असून यातील तिघे जण अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले .तर चौथ्या आरोपीचे नाव मयुर अतुल भोसले वय १९ वर्ष रा.सर्वे नं.०५, वेताळबाबा वसाहत, गणपती मंदिराजवळ गाडीतळ,हडपसर असे आहे.
पोलिसांनी याप्रकरणी सांगितले कि,'दिनांक ०२.०९.२०२४ रोजी नियंत्रण कक्ष पुणे शहर येथून कॉल प्राप्त झाला एका माणसाला दगडाने मारून टाकले आहे त्यात तो मयत झाला आहे. प्राप्त झालेल्या कॉलच्या ठिकाणी पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-०५ आर. राजा, पोलीस उपआयुक्त परिमंडळ ३.पुणे, संभाजी कदम, पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा, निखील पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभागअश्विनी राख, सहायक पोलीस आयुक्त, आस्थापना विभाग, ऊंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक, (गुन्हे) निलेश जगदाळे, पोलीस निरिक्षक (गुन्हे) मुंढवा पोलीस ठाणे पुणे शहर, निकम, सहायक पोलीस निरिक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उपनिरिक्षक महेश कवळे हडपसर पोलीस ठाणे यांनी भेट दिली.
उत्कर्षनगर सोसायटी समोरील फुटपाथवर, हडपसर पुणे येथे एक इसम रक्ताचे थारोळ्यात पडलेला दिसला तसेच त्याचे चेहऱ्यावर कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्यातरी धारदार शस्त्राने निघृणपणे वार करुन चेहरा छिन्नविछीन्न केल्याचे दिसले. सदरचा इसम हा वासुदेव रामचंद्र कुलकर्णी वय ४७ वर्षे रा.बी/५, प्लॅट नं.०८, उत्कर्षनगर सोसायटी, सासवड रोड हडपसर पुणे असा असल्याची माहीती प्राप्त झाली. तसेच त्यांची शनिवार पेठ पुणे येथे गृहकर्ज करुन देण्याची एजन्सी असल्याबाबत समजले. झाले प्रकाराबाबत मयत इसम याचा भाऊ याने फिर्याद दिल्याने हडपसर पोलीस ठाणेस गु.र.नं.१३८७/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम १०३ प्रमाणे अनोळखी आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. दाखल गुन्ह्याचे गांभिर्य ओळखून वरिष्ठ पोलीस पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन संतोष पांढरे, यांच्या
मार्गदर्शनाप्रमाणे व सुचनांप्रमाणे तपासपथक अधिकारी अर्जुन कुदळे, सहा पोलीस निरीक्षक, महेश कवळे, पोलीस उप निरीक्षक, व स्टाफ यांनी दाखल गुन्ह्यातील घटनेबाबत माहीती मिळण्याच्या अगोदर सुमारे ४ तासांचे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले. त्याआधारे मिळालेल्या उपयुक्त माहीतीच्या आधारे आरोपीनामे १) मयुर अतुल भोसले वय १९ वर्ष रा. सर्वे नं.०५, वेताळबाबा वसाहत, गणपती मंदिराजवळ गाडीतळ हडपसर पुणे. व इतर ३ विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेतले.ताब्यात घेतले आरोपी यांचेकडे केले तपासात आरोपी यांनी दाखल गुन्हा केल्याची कबुली देवून सांगीतले की, मयत इसम पायी फिरत असताना त्याचेकडे मोबाईल हॉटस्पॉट मागीतले. मोबाईल हॉटस्पॉट मागितल्याचा राग आल्याने मयत इसम व आरोपी यांच्यात शिवीगाळ झाली. तसेच मयत इसम याने आरोपी याच्या कानाखाली वाजवल्याने त्याचा राग मनात धरून खुन केल्याचे सांगीतले. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.