कोलकात्यातील आणखी एका रुग्णालयात महिलेवर अत्याचार, वॉर्ड बॉय अटकेत...
पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यात महिलांवरील अत्याचार थांबायचे नाव घेत नाहीये. येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येवरुन सुरू असलेला गदारोळ अजूनही थांबलेला नाही. अशातच, कोलकाता येथील आणखी एका रुग्णालयात महिलेचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोलकाता पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 26 वर्षीय पीडित महिलेच्या मुलावर कोलकाता येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. रात्री आई मुलाजवळ झोपली होती. यावेळी हॉस्पिटलच्या वॉर्ड बॉयने महिला झोपेत असताना तिचा विनयभंग केला आणि मोबाईलमधून व्हिडिओही बनवला. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तरुणाला अटक केली.
वॉर्डबॉयने झोपलेल्या महिलेला बनवले शिकार
कोलकात्याच्या इन्स्टिट्यूट ऑफ चाइल्ड हेल्थमध्ये शनिवारी ही घटना घडली असून, महिलेने रविवारी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आणि वर्षीय तरुणाला अटक केली. महिलेने आरोपीवर चुकीच्या पद्धतीने स्पर्ष करणे आणि व्हिडिओ शूट केल्याचा आरोप केला आहे.
महिलांसाठी रुग्णालय सुरक्षित नाही : मालवीय
दरम्यान, बंगाल भाजपचे केंद्रीय सहप्रभारी अमित मालवीय यांनी या घटनेबाबत ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर निशाणा साधला. पश्चिम बंगालमध्ये चालणारी सरकारी रुग्णालये महिलांसाठी असुरक्षित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.