Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जर जिभेच्या खाली दिसली 'ही' लक्षणे, तर समजून जावा हा तर कॅन्सर!

जर जिभेच्या खाली दिसली 'ही' लक्षणे, तर समजून जावा हा तर कॅन्सर!
 

आजकालच्या या धावपळीच्या जीवनात कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जर कॅन्सरला वेळीच रोखले गेले नाही तर मग हा आजार आपल्या जिवावर सुद्धा बेतू शकतो. कॅन्सरबद्दल एक गोष्ट अनेकदा बोलली जाते ती म्हणजे जर वेळीच या आजाराचे निदान झाले तर त्यावर उपचार शक्य असतो.

दरवर्षी जगभरात अंदाजे कोट्यावधी लोकांचा कॅन्सरमुळे मृत्यू होत असतो. ही खरंच चिंतेची बाब आहे. भारतातही कॅन्सर झपाट्याने वाढत आहेत. इंडिया अगेन्स्ट कॅन्सरच्या अहवालानुसार, भारतात सुमारे २७ लाख लोक कॅन्सरवर उपचार घेत आहेत. त्यापैकी 2020 मध्ये 8.5 लाख लोकांचा कर्करोगामुळे मृत्यू झाला आहे. अनेक अहवाल असेही सूचित करतात की जर वेळेवर या आजाराचे उपचार केले गेले नाहीत तर कॅन्सरच्या केसेसमध्ये झपाट्याने वाढ होईल.

केवळ 5-10 टक्के प्रकरणांसाठी जीन्स जबाबदार असतात. बाकीच्यासाठी पर्यावरण आणि आपली लाइफस्टाइल जबाबदार असते. कॅन्सर टाळायचा असेल तर सुरुवातीच्या काळात त्याला ओळखणे सर्वात महत्त्वाचे आहे. जेणेकरून, त्यावर वेळीच उपचार सुरू करून त्या व्यक्तीचा जीव वाचवला जाऊ शकतो. तुमच्या जिभेत झालेलं बदल ओळखून सुद्धा कॅन्सर आजाराला वेळीच थांबवू शकता.

जर एखाद्या व्यक्तीच्या जिभेचा रंग अचानक काळा होऊ लागला असेल तर समजून जावा की त्याला घशातील संसर्ग आणि बॅक्टेरियाच्या संसर्गाची सुरुवातीची लक्षणे असू शकते. यासह. मधुमेहाच्या रुग्णांच्या जिभेचा रंगही काळा होऊ लागतो. कर्करोगातही जिभेचा रंग काळा होऊ लागतो. त्याचबरोबर पोटात अल्सर आणि बॅक्टेरियाच्या संसर्गामध्ये सुद्धा जिभेचा रंग काळा होण्यास सुरुवात होते.
1. दात मोकळे होणे
3. ओठावर सूज किंवा जखमा येणे ज्या बऱ्या होत नाही
4. गिळताना त्रास किंवा वेदना
5. बोलताना बदल होणे
6. तोंडातून रक्त येणे किंवा बधीर होणे
7. जीभ किंवा हिरड्यांवर पांढरे किंवा लाल ठिपके
8. कोणत्याही कारणाशिवाय वजन कमी होणे

1. तंबाखू किंवा दारूचे अतिसेवन
2. मानवी पॅपिलोमाव्हायरस (HPV)
3. एपस्टाईन-बॅर व्हायरस (EBV)
4. जेनेटिक समस्या
5. तोंडाची अस्वच्छता
7. सूर्याच्या जास्त संपर्कात राहणे
8. सुपारी जास्त प्रमाणात चघळणे

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.