Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महिलांच्या तुलनेत पुरुषांना सोरायसिसचा धोका दुप्पट; जाणून घ्या लक्षणे

महिलांच्या तुलनेत पुरुषांना सोरायसिसचा धोका दुप्पट; जाणून घ्या लक्षणे
 

सोरायसिस हा एक त्वचारोग आहे. हा रोग पुरुषांना तसेच महिलांना देखील होत असतो. परंतु महिलांच्या तुलनेत पुरुषांना या रोगाची लागण होण्याची शक्यता दुप्पट असते. हा एक स्वयंप्रतिकार रोग आहे. हा रोग झाल्यावर कोरडी त्वचा बाहेर येऊ लागते. आणि पाठीवर तसेच कोपऱ्यावर पायावर लाल खवलेयुक्त फोड येतात. आणि तेथील त्वचा एका वेगळ्या प्रकारे दिसू लागते.

सोरायसिस म्हणजे काय ?

सोरायसिस हा खूप काळापर्यंत चालणार आहे. हा एक त्वचारोग आहे. यामध्ये त्वचेच्या पेशींच्या जलद वाढीमुळे जाड लाल खवलेयुक्त त्वचा निर्माण होते. हा आजार सहसा कोपरे, गुडघे, पाठीच्या खालचा भाग डोक्याला लागून असलेले भाग या ठिकाणी येतात. आलेली नवीन त्वचा म्हणजे कोरडे त्वचेच्या पेशींचा एक समूह असतो. आता या रोगाची आपण नक्की लक्षणे काय आहेत हे जाणून घेऊयात.

या रोगाची लक्षणे
खाज सुटणे किंवा जळजळ होणे.
नखे सुजतात आणि कोरडी होतात.
त्वचा तुटल्यासारखी दिसते तसेच त्वचेला लाल लाल फोड येतात.
या आजारावर अजूनही कोणता इलाज उपलब्ध नाही. तरीही तुम्ही योग्य औषधे आणि जीवनशैलीमध्ये योग्य तो बदल करून या रोगाचे व्यवस्थापन करू शकता. आणि जास्त होण्यापासून टाळू शकतात.
सोरायसिसचा इलाज नाही

सोरायसिस हा त्वचेशी संबंधित असणारा एक आजार आहे. हा अत्यंत धोकादायक असा आजार आहे. खास गोष्ट म्हणजे कोणत्याही वयामध्ये हा आजार होऊ शकतो. परंतु त्यावर कोणताही जालीम असा उपाय उपलब्ध नाही. हा कधीही न संपणारा आजार आहे. परंतु त्याला तुम्ही काळजी घेऊन नियंत्रित करू शकता. ज्या लोकांना आधी कोणता त्वचारोग आहे. त्यांना या आजाराचा धोका होऊ शकतो.

सोरायसिसचे कारण
तुमच्या रोगप्रतिकारशक्तीतील बिघाड झाल्यामुळे सोरायसिस होतो. असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. या आजारात रोगप्रतिकार शक्ती अतिक्रियाशील असते. त्यामुळे शरीरातील चांगल्या पेशी नष्ट होऊ लागतात. यावर ज्याचा त्वचेवर परिणाम होतो. सुरुवातीला तुमच्या त्वचेवर खाज येते. परंतु जर तुम्ही वेळीच काळजी घेतली नाही, तर हा आजार वाढत जातो. त्वचेवर खवले तयार होतात आणि जखमा देखील होतात. कधी कधी सोरायसिसचे कारण आनुवंशिक देखील असू शकते.

सोरायसिसचा जास्त परिणाम हा हात पाठीवर दिसून येतो. आणि त्यानंतर तो हळूहळू संपूर्ण शरीरात पसरतो. वाढत्या वयानुसार हा आजार अधिकच धोकादायक बनतो. तुम्ही जर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य आहार आणि त्वचेची काळजी घेऊन घेतली, तर हा आजार तुम्ही नियंत्रणात आणू शकता. या सोरायसिसच्या आजारामुळे तुमच्या मानसिक आरोग्यावरही बऱ्याच वेळा परिणाम होते. यामुळे लोक बाहेर जाणे टाळतात. लोकांना भेटत नाही त्यांना कमीपणा वाटतो त्यामुळे चिंता आणि नैरास्य देखील वाढू शकते.
सोरायसिस कसे टाळावे ?

तुमच्या त्वचेला कधीच कोरडी ठेवू नका. सतत त्यावर मॉइश्चरायझर वगैरे लावा. त्याचप्रमाणे जर खाज येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. जास्त दारू पिऊ नका. त्वचेवर रोज मॉइश्चरायझर वापरा.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.