राज्यात पुन्हा राजकीय उलथापालथ होणार; अजित पवारांच्या मनात नक्की चाललंय काय?
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आपले काका शरद पवार यांच्याकडे परत जाऊ शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे अन्य सहकारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर काहीसे नाराज असल्याचे दिसत आहे.
त्यामुळेच ते हळूहळू या दोघांना टाळू लागल्याचे दिसत आहे. त्यामुळए अजित पवार यांचे हृदयपरिवर्तन होत असून लवकरच ते काका शरद पवार यांच्या आश्रयाला जाऊ शकतात, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.आपल्या देशाच्या राजकारणात कधी काय होईल याची शाश्वती नाही. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच आणखी एक राजकीय नाट्य पाहायला मिळू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज नेते शरद पवार यांना बाजूला सारून त्यांचे पुतणे अजित पवार यांनी पक्षाला खिंडार पाडले आणि आमदारांसह महाआघाडीच्या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री झाले.
काकांचा पक्ष तोडून ते पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले, पण आता त्यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्चीचा प्रवास खूप दूरचा वाटत आहे. जसजसे दिवस सरत गेले, तसतसे अजित पवारांचे वास्तव समोर येऊ लागले. एकीकडे पक्षातील लोक त्यांच्या अनेक निर्णयांवर नाराज असून जुन्या पक्षात परतण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचवेळी लाडकी बहीण योजनेच्या नावावरून शिंदे गट आणि अजित पवार गटातील मदभेदह चव्हाट्यावर आले. दोन्ही गटात अद्यापही शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच गुरुवारी मुंबईतील कोस्टल रोड ते वांद्रे वरळी सी-लिंक या रस्त्याच्या उद्घाटनाच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ते दिसले नाहीत.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांवर नाराज असल्याचे मानले जात आहे. इतकंच नाही तर त्यांनी अमित शहांच्या कार्यक्रमापासूनही अंतर राखल्याचे दिसून आले मात्र याची चर्चा होऊ लागल्यावर त्यांनी मुंबई विमानतळावर जाऊन अमित शहांना निरोप देण्याची औपचारिकता पार पाडली.अलीकडच्या काळात ज्या प्रकारे राजकीय समीकरणे बदलत आहेत, त्यामुळे अजित पवारांना शरद पवारांपेक्षा वेगळे राजकारण करता येणार नाही, असे वाटू लागले आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत बारामतीतून चुलत बहिण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पत्नीला उभे करणे ही मोठी चूक असल्याचे त्यांनी मान्य केले. राजकारण घरात येऊ द्यायला नको होते, असे त्यांना वाटू लागले आहे.एवढेच नाही तर भारतीय जनता पक्षाची पितृ संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघही अजित पवार यांच्या महायुतीतील प्रवेशावर खूश नाही. अजित पवार महायुतीतल सामील झाल्यामुळे महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा फायदा झाला नाही, उलट मोठे नुकसान झाले, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अशा परिस्थितीत अजित पवार विधानसभेतही पक्षासोबत राहिले तर पक्षाचे नुकसान होऊ शकते. सतत बदलणाऱ्या राजकीय परिस्थिती आणि समीकरणांमध्ये अजित पवारांना आता काकांच्या आश्रयाला गेल्यास आपल्या काही कृत्याचा पश्चाताप होऊन भविष्यातील राजकीय खेळी बळकट करता येईल, असे वाटू लागले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.