Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'जम्मू-काश्मीरमध्ये जगातला सहावा सर्वात मोठा खनिजाचा साठा सापडला', नितीन गडकरी यांच्याकडून मोठी बातमी

'जम्मू-काश्मीरमध्ये जगातला सहावा सर्वात मोठा खनिजाचा साठा सापडला', नितीन गडकरी यांच्याकडून मोठी बातमी
 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. “पुढच्या पाच वर्षात तुम्हाला डिझेल गाड्या दिसणारच नाहीत तर शंभर टक्के इलेक्ट्रिक बसेस दिसतील. मला विश्वास आहे, इंजिनियरचं संशोधन फार महत्त्वाचं आहे.

टेस्लाचे अधिकारी ऋषीकेश सागर यांची माफी मागून सांगतो की, आम्ही पुढे नक्कीच अमेरिकेच्याही पुढे जावू असा मला विश्वास आहे. आज जगातील सर्व ऑटो मोबाईल जँग्स फक्त एक सोडून सर्व भारतात आहेत. मी काही दिवसांपूर्वी पुण्यात चाकणमध्ये इलेक्ट्रीक मर्सिडीज गाडीच्या उद्घाटनाला आलो होतो. त्याआधी मी ब्लू एनर्जी कंपनीच्या एलएनजी ट्रक लाँच केला त्यासाठी चाकणमध्ये आलो होतो. मला विश्वास आहे की, आज आपल्या इंडस्ट्रीमध्ये इतकी टेकनोलॉजी बदलत आहे की, इलेक्ट्रिक ऑटो मोहाईलमध्ये लिथियम आयन बॅटरी अतिशय महत्त्वाची आहे. आपल्या देशात जम्मू-काश्मीरमध्ये लिथियम आयनचा साठा मिळाला आहे, तो जगातला सहावा साठा आहे”, अशी महत्त्वाची माहिती नितीन गडकरी यांनी दिली.

“मी जेव्हा इलेक्ट्रिक गाड्या सुरु केल्या तेव्हा लिथियम आयन बॅटरीची किंमत 150 डॉलर पर किलो व्हॅट पर हवर होती, आता ती 105 किलो व्हॅट पर हवर झाली आहे. मला आनंद आहे की, आपल्या स्टार्टअपमधील इंजिनियर्सने केवळ लिथियम आयन बॅटरी नाही तर झिंक आयन, अॅल्युमिनियम आयन, सोडीयम आयन या केमिस्ट्रीमध्ये खूप सुंदर काम केलेलं आहे. मला विश्वास आहे की, लवकरच आपण खूप खूप मोठं काहीतरी करु दाखवं. कारण तसं रिसर्च इथे सुरु आहे”, असं नितीन गडकरी म्हणाले.

‘एकवेळा सेमीकंडक्टरमध्ये अशी स्थिती होती की…’

“एकवेळा सेमीकंडक्टरमध्ये अशी स्थिती होती की, जगात सेमीकंडक्टरचा शॉर्टेज होता. वॉशिंगमशीन पासून बसपर्यंत सेमीकंडक्टर लागतं. पण आता आपण जगात सेमीकंडक्टरच्या बाबतीत जगातलं नंबर वन हब बनणार आहोत. आपण जेव्हा मोबाईल फोन सुरु झाला तेव्हा आपल्या देशात मोठ्या प्रमाणात मोबाईल, फोन इनपूट व्हायचा. आता आज आपला देश मोठ्या प्रमाणात मोबाईल, फोन एक्सपोर्ट करणारा झाला. त्याचं कारण रिसर्च, इनोव्हेशन आहे”, असं नितीन गडकरी म्हणाले.

‘मी ज्यावेळेस जपानमध्ये गेलो होतो त्यावेळेस…’
“याबाबतीत भारतीय इंजिनियर चांगलं काम करत आहेत. मी ज्यावेळेस जपानमध्ये गेलो होतो त्यावेळेस तिथल्या पंतप्रधानांनी मला विचारलं होतं की, तुमच्या देशातील सॉफ्टवेअर इंजिनियर एवढे हुशार का आहेत? त्यांच्या डोक्यात मॅथेमॅटिक्सचे जिन्स आहेत का? आज आपल्या देशात सर्वात मोठी ताकद आहे. जिथे यंग टॅलेन्टेड इंजिनियर पावर सर्वात जास्त आहे त्या देशाचं नाव हिंदुस्तान आहे. त्यामुळे आपल्या इथला लेबर कॉस्ट इतर देशांच्या तुलनेत खूप कमी आहे आणि मटेरियल कॉस्टही कमी आहे”, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं.

“आता आम्ही स्क्रॅपिंग पॉलिसी आणलं आहे की, 15 वर्षांचं वेहिकल स्क्रॅप करावं लागेल. विटनेस सर्टिफिकेट घ्यावं लागेल. आपल्या देशात आपण अॅल्यूमिनियम, कॉपर, लिथियम, प्लास्टिक, रबर इनपूट करतो. यावर आपण रिसायक्लिंग करु तेव्हा या वस्तूका मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल. त्यामुळे प्रदूषण विरहित सर्व गोष्टी पूर्ण होणार आहेत. येणाऱ्या काळात आत्मनिर्भर भारत फाईव्ह ट्रिलियन डॉलरची इकोनॉमी करावी आणि जगातील तिसरी अर्थव्यवस्था आपली व्हायला पाहिजे, असं ध्येय पंतप्रधानांनी ठेवलं आहे. त्यासाठी एक्सपोर्ट वाढायला हवं आणि इनपूट कमी केलं पाहिजे”, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.