घरच्या घरी जाणून घ्या हृदयात ब्लॉकेज आहे की नाही, डॉक्टरांनी सांगितल्या सोप्या टिप्स...
चुकीची लाइफस्टाईल, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, शरीराची हालचाल न करणे अशा अनेक कारणांमुळे हृदयरोगांचा धोका वाढतो. हृदयरोगांमुळे जीव जाणाऱ्यांची संख्या जगभरात जास्त आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे हृदयरोग होतात आणि हृदय काम करणं बंद करतं. अशात हॉस्पिटलमध्ये गेल्यावर ईसीजी आणि इकोसारख्या टेस्ट करून हृदयाच्या क्रिया कशा होत आहेत याची माहिती मिळते.
सामान्यपणे हृदयाचं आरोग्य कसं आहे हे जाणून घेण्यासाठी डॉक्टर या टेस्टची मदत घेतात. मात्र, काही गोष्टींच्या मदतीने तुम्ही घरीच हृदयाचं आरोग्य कसं आहे याची माहिती मिळवू शकता. यासाठी ना तुम्हाला मशीन लागते ना पैसे. अॅडल्ट अॅन्ड पीडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर चंद्रिल चुग यांनी सांगितलं की, कशाप्रकारे घरी बसूनच तुम्ही हृदयाच्या कमजोरीची माहिती मिळवू शकता.
कंबरेची साईज मोजा
जर्नल ऑफ द अमेरिकन हार्ट असोसिएशनवर प्रकाशित एका रिपोर्टनुसार, हार्ट अटॅकचा धोका जाणून घेण्यासाठी कंबरेची साईज मोजणे हा एक उपाय आहे. एका अंदाजानुसार, कोणत्याही पुरूषाच्या कंबरेची साईज ३७ इंचापेक्षा जास्त असेल तर त्यांचं हृदय कमजोर असू शकतं. तेच महिलांमध्ये हे याची सीमा ३१.५ इंच असते. पुरूषांमध्ये ४० इंच आणि महिलांमध्ये ३५ इंच हृदयासाठी गंभीर ठरू शकते. कारण लठ्ठपणामुळे हृदयावर अधिक दबाव पडतो. लठ्ठपणा असल्यावर शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढणं कॉमन आहे आणि याने फॅट नसांमध्ये ब्लॉकेज करण्याचं कारण ठरतं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.