पृथ्वीराज पाटील यांच्या "संवाद सांगलीसाठी" उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद..
सांगलीकरांचे विकसित सांगलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटणार
पृथ्वीराज पाटील
सांगली दि. सांगलीचा उद्योग, व्यापार, शिक्षण,शेती, आरोग्य, क्रिडा, आर्थिक,सांस्कृतिक, महिला व बालकल्याण,युवा वर्ग इ. क्षेत्रात चौफेर विकास करुन विकसित सांगलीचे स्वप्न साकार करण्यासाठी सांगलीकरांच्या सूचना व मार्गदर्शनासाठी थेट भेटून संवाद साधण्यासाठी "संवाद सांगलीसाठी" हा उपक्रम हाती घेतला आहे.असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केले. आमराई व बापट मळा येथील महावीर उद्यानात सांगलीकरांशी संवाद साधताना ते बोलत होते. सांगली अधिक चांगली करण्यासाठी नागरिकांनी आपल्या नागरी समस्या,विकासाच्या संकल्पना मांडाव्यात असे पृथ्वीराज यांनी आवाहन करताच उत्स्फूर्तपणे सांगलीकरांनी सूचना केल्या.
यावेळी सौ. वाकनकर यांनी उद्यान व क्रिडांगणावर स्वच्छतागृहे सुरक्षित व स्वच्छ करा, राजू बावडेकर यांनी नदी स्वच्छता व प्रदूषण नियंत्रण व्हावे, अरुणभाई शहा यांनी जनता टॅक्स भरते तशा सुविधा त्यांना मिळाल्या पाहिजेत, जोशी वकीलांनी मिरज सांगली सर्विस रोड वहातूक नियंत्रण, रमेश मेहता यांनी गणपती पेठ वहातूक कोंडी समस्या , शुध्द पाणी, लाईट व चांगले रस्ते मिळावेत, शिवाजी रुईकर यांनी कमर्शियल टॅक्स कमी करा, योगेश सुर्यवंशी यांनी वखार भाग गावठाण समावेश व वाहनतळ प्रश्न, अजय शहा यांनी रस्ते चांगले करा, डॉ. विजय बोराडे यांनी सांगली अधिक चांगली करा..शहर समस्यामुक्त झाले पाहिजे.डाॅ. उदय जगदाळे यांनी गुन्हेगारी प्रतिबंधासाठी नशीले पदार्थ प्रतिबंध, संभाजी पोळ यांनी विमानतळ झाले पाहिजे, सिमेंट रस्ते करा, शाम वैद्य यांनी लहान मुलांना खेळायला मैदानं उपलब्ध करा.. प्रदूषण नियंत्रण करा, सुहास वाळवेकर यांनी मुताऱ्या वाढवा, सिटी बस सुविधा, विनायक शेटे यांनी शंभरफुटी अतिक्रमण, खोक्यांची समस्या, सिंथेटीक ट्रॅक करा, प्रा. चव्हाण मॅडम यांनी वर्दळीच्या ठिकाणी उड्डाण पूल बांधा, उद्योजक चंद्रकांत पाटील सांगली स्मार्ट सिटी झाली पाहिजे, रेल्वे हाॅस्पिटल इ. मुद्दे मांडले.
सांगली समस्यामुक्त करुन विकसित सांगलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जनतेशी थेट संपर्क साधण्याचा हा सांगलीतील स्तुत्य असा पहिलाच उपक्रम आहे अशा जनतेतून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पृथ्वीराज पाटील यांच्या या उपक्रमाचे सांगलीकराकडुन स्वागत होत आहे. विविध स्तरातील सांगलीकरांनी नागरी सुविधा व विकासाबाबत मौलिक सूचना केल्या. यावेळी विविध स्तरातील सांगलीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.