आईवरून शिवीगाळ केली, छतावर लटकलेल्या अवस्थेत सापडलं बॉसचं मुंडकं!
ठाण्यात दोन दिवसांपूर्वी एका उच्चभ्रू सोसायटीच्या छतावर मुंडक छाटलेला एक मृतदेह आढळला होता. ही घटना समोर येताच ठाण्यात एकच खळबळ उडाली होती. ज्या कृतीनं हत्या करण्यात आली होती हे पाहून पोलीस देखील आवक झाले होते.
या हत्येचा आता उलगडा झाला आहे. ठाण्यातील कापूरबावडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा गुन्हा घडला होता. गुन्ह्याची तीव्रता पाहता पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला यामध्ये ज्याची हत्या झाली आहे त्या व्यक्तीचं नाव सोमनाथ सातगीर वय वर्ष ३५ असा असून तो या उच्चभ्रू सोसायटीचा सुपरवायझर असल्याचा समोर आलं आहे. पोलिसांनी सोमनाथ सातगिरी याचा मोबाईल तपासला असता त्याच्यावर काही संशयास्पद गोष्टी पोलिसांना लक्षात आल्या होत्या. यावरून त्याच्याच हाताखाली कामाला असलेला लिफ्टमन प्रसाद कदम याने सोमनाथ सदगीर याची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.
दरम्यान दोन दिवसातच पोलिसांनी प्रसाद कदमच्या मुसक्या अवळल्या आणि जेव्हा प्रसादची चौकशी केली त्यावेळी त्याच्या चौकशीतून धक्कादायक कारणे समोर आली आहेत. सुपरवायझर सोमनाथ याने कामावर असताना प्रसाद कदम याला आईवरून शिवीगाळ केला होता आणि याचाच राग प्रसादच्या मनात होता. तर सोमनाथ यांच्याकडून प्रसादने आठ हजार रुपये देखील उधार घेतले होते. उधार घेतलेले पैसे मागताना सोमनाथ याने प्रसादला आईवरून शिवीगाळ केली होती. त्यामुळं प्रसादच्या मनात सोमनाथबद्दल राग होता. त्यामुळं त्यानं सोमनाथचा काटा काढण्याचे ठरवले.सोमनाथची हत्या करण्यासाठी त्याने सोशल मीडियावर जाऊन अनेक क्राईम सिरीज पाहिल्या. तसंच, कशारितीने हत्या केली जाते, हत्या केल्यानंतर कसं पळून जातात, हत्यार कुठे लपवता येतात, या सगळ्या गोष्टी करता प्रसादने वेब सिरीज पाहिल्या होत्या. त्यानंतर प्रसादने ठरवून सोमनाथला टेरेसवर नेलं तिथे त्याने आणलेल्या हत्याराने सोमनाथवर सपासप वार करायला सुरुवात केली. सोमनाथ जमिनीवर कोसळतात प्रसादने त्याच्या गळ्यावर हत्यार फिरवून त्याचं मुंडक छाटलं आणि घटनास्थळावरून फरार झाला.या घटनेनंतर ठाणे पोलिसांच्या क्राइम ब्रांचच्या युनिट -५ च्या विकास घोडके यांच्या टीमने सांगलीतून प्रसादच्या मुसक्या अवाळल्या. प्रसादला क्राइम ब्रांच युनिट -५ ने कापूरवाडी पोलिसांच्या ताब्यात दिला असून कापूरवाडी पोलिसांनी प्रसादला कोर्टात हजर केले. आरोपीला २६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हत्याकरता वापरलेली हत्यार अजूनही हस्तगत झाले नसून या हत्याराच्या शोध पोलिस घेत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.