Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चिकन तंदुरी शिग कबाब होणार बंद, मुंबई महापालिकेने उचलले हे पाऊल

चिकन तंदुरी शिग कबाब होणार बंद, मुंबई महापालिकेने उचलले हे पाऊल 
 

मुंबईतील रस्त्यावर आता चिकन तंदुरी आणि शिग कबाब मिळणे बंद होणार असून उघड्यावर कोळशावर चालणाऱ्या भट्टयांमध्ये अशाप्रकारे खाद्यपदार्थ बनवले जात असतील तर त्यांच्यावर बंदी आणली जाणार आहे.

पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून जळावू लाकडे आणि कोळशावर चालणाऱ्या भट्ट्या बंद करून विद्युत वाहिनी तसेच पीएनजीवर आधारीत वाहिनींच्या भट्टयांचा वापर करण्यासाठी महापालिकेच्यावतीने मार्गदर्शक धोरण बनवले जात आहे. महापालिकेच्यावतीने या मार्गदर्शक धोरणांचा मसुदा तयार केला जात आहे. त्यामुळे याबाबतच्या मार्गदर्शक धोरणाला मंजुरी मिळाल्यानंतर याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करून अशाप्रकारे कोळशावर व लाकडांवर चालणाऱ्या भट्ट्यांवर कारवाई केली जाणार आहे. 

मुंबईत पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून प्रदुषित हवेचे प्रमाण कमी करण्यासाठी जळावू लाकूड आणि कोळशावर आधारीत भट्टयांवर कारवाई करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. मात्र, ही कारवाई करता यावी यासाठी मार्गदर्शक धोरण बनवण्याचे काम यापूर्वीच हाती घेण्यात आले. या दृष्टकोनातून महापालिकेच्या पर्यावरण विभागाने काही रेस्टॉरंटना कोळशावर भट्टी चालत असल्याने त्या बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय काही हॉटेल्स आणि भाटारखाना आदी ठिकाणी बाहेरच शिग कबाब आणि चिकन तंदुरी बनवत असल्याने त्यावरही कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. असे खाद्य पदार्थ शिजवणाऱ्या हॉटेल्स आदींना यापुढे कोळशावर आधारित भट्ट्यांचा वापर कमी करून विद्युत किंवा शक्य असेल तर पिएनजी वर आधारित भट्ट्यांचा वापर करावा अश्या सूचना केल्या आहेत. 

दरम्यान, बेकरी पदार्थांच्या उत्पादनांमुळे मुंबईतील हवा प्रदुषित होत असल्याची बाब समोर आल्याने बाँबे इन्व्हॉयमेंटल ऍक्शन ग्रुप अर्थात (बीइएजी) यांनी मुंबईतील बेकऱ्यांचा सर्वे केला. मुंबईत महापालिकेच्या आरोग्य विभागांत नोंदणीकृत अशा ६२५ बेकरी असून यातील सुमारे २०० बेकरींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. मुंबईतील १७ वॉर्डांमधील बेकरींना प्रत्यक्ष भेट देऊन अणि सर्वेक्षण करून इंधनाचा वापर, बेकरींची कार्यपध्दती आणि स्वच्छ इंधनामध्ये परिवर्तन होण्याची व्यवहार्यता या आधारीत सर्वे करून बेकरींचा अभ्यास करून हा अहवाल बनवण्यात आला आणि याचा अहवाल महापालिकेला सादर केला आहे.मात्र, त्यापूर्वीच महापालिका पर्यावरण विभागाने याबाबतच्या मार्गदर्शक तत्वे बनवण्याचे काम हाती घेतले होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.