पश्चिम बंगालच्या नबाग्रामचे तृणमूल काँग्रेसचे आमदार ट्रेनमध्ये प्रवास करताना आपल्या पत्नीच्या नावावर दुसऱ्याच महिलेसोबत प्रवास करताना आढळले. यावेळी तिकीट तपासणीसाने महिलेकडे ओळखपत्र मागितल्यावर आमदार आणि त्यांच्या समर्थकांनी त्याला जिवे मारण्याची धमकी दिली.
पश्चिम बंगालच्या नबाग्रामचे तृणमूल काँग्रेसचे आमदार ट्रेनमध्ये प्रवास करताना आपल्या पत्नीच्या नावावर दुसऱ्याच महिलेसोबत प्रवास करताना आढळले. यावेळी तिकीट तपासणीसाने महिलेकडे ओळखपत्र मागितल्यावर आमदार आणि त्यांच्या समर्थकांनी त्याला जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आमदार कनाई चंद्र मंडल महिलेसोबत इंटरसिटी एक्स्प्रेसने प्रवास करत होते. यावेळी आमदारांसोबतच्या महिलेचे वय व तिकिटावरील महिलेच्या वयात टीसीला अंतर वाटल्याने त्याने महिलेचे ओळखपत्र मागितले. मात्र, याचा आमदारांना राग आल्याने त्यांनी थेट जिवे मारण्याची धमकी दिली. सध्या टीसीने दंड ठोठावत विधानसभेच्या अध्यक्ष आणि राज्यपालांकडे आमदारांची तक्रार केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.