जीवघेणा ठरु शकतो किडनी कॅन्सर, 'ही' आहेत सुरुवातीची लक्षणं
जगात असे अनेक आजार आहेत, त्यांची नावे ऐकताच लोक हैराण होतात. कॅन्सर हा अशाच आजारांपैकी एक आहे. याचे अनेक प्रकार आहेत, ज्यामध्ये किडनीचा कॅन्सर देखील आहे.
किडनीच्या कॅन्सरला 'रेनल सेल कार्सिनोमा' असेही म्हणतात. किडनी हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. हे लघवीद्वारे शरीरातील टॉक्सिन काढून टाकते. पण अनहेल्दी लाइफस्टाइल आणि इतर अनेक कारणांमुळे किडनी कॅन्सरचे प्रमाण वाढतेय. किडनीच्या कॅन्सरची लक्षणे शेवटच्या टप्प्यापर्यंत कळत नाहीत. अशा वेळी अधिक सतर्कतेची गरज आहे. मात्र काही खास संकेतांवरून लक्षणे जाणून घेतल्यास जीवघेणा आजार योग्य वेळीच ओळखता येऊ शकतो. चला तर मग पाहूया किडनी कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं कोणती.
'मेयो क्लिनिक'च्या रिपोर्टनुसार, किडनी कॅन्सरदरम्यान पेशी घातक (कॅन्सरयुक्त) बनतात. या परिस्थितीत ते ट्यूमर देखील तयार करू शकतात. किडनी कॅन्सरच्या बहुतेक प्रकरणांमध्ये, रुग्णांमध्ये किडनीच्या कॅन्सरची लक्षणे लवकर दिसून येत नाहीत. ही लक्षणे दिसू लागेपर्यंत ट्यूमर मोठा झालेला असतो. म्हणून, त्याचे वेळेवर उपचार करणे फार महत्त्वाचे आहे.
किडनी कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे किडनी कॅन्सर पहिले किडनीच्या ट्यूबलर लेअरमध्ये दिसून येतो. त्याच वेळी, लघवीमध्ये रक्त येत असेल आणि ते गुलाबी, लाल रंगाचे असेल तर ते मूत्रपिंडाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. याशिवाय पोटाच्या बाजूला ट्यूमर, भूक न लागणे, एकाच बाजूला सतत दुखणे, अचानक वजन कमी होणे, थकवा येणे, घोट्याला सूज येणे हीही सुरुवातीची लक्षणे आहेत. या अवस्थेत श्वास घेण्यास अडचण, खोकल्यामध्ये रक्त आणि हाडांमध्ये वेदना होऊ शकतात.प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळी असू शकतात लक्षणं किडनी कॅन्सरची लक्षणे व्यक्तीपरत्वे वेगवेगळी असतात. काही लोकांना नियमित पोटदुखीचा अनुभव येऊ शकतो. इतरांना सूक्ष्म लक्षणे जाणवू शकतात. कॅन्सर वाढेपर्यंत इतर लोकांना कोणतीही लक्षणे दिसू शकत नाहीत. त्यामुळे सतर्क रहा. कोणतीही लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय मदत घ्या, विशेषतः जर ती कायम राहिली किंवा कालांतराने परिस्थिती आणखी वाईट होत जाते.
किडनी कॅन्सरचा जास्त धोका कोणाला? रिपोर्टनुसार जे लोक जास्त सिगारेट आणि अल्कोहोलचे सेवन करतात त्यांना किडनी कॅन्सरचा धोका जास्त असतो. याशिवाय लठ्ठपणा देखील याचं कारण असू शकतो. या सर्वांशिवाय हाय ब्लड प्रेशर आणि वृद्धापकाळामुळेही किडनीच्या कॅन्सरचा धोका वाढतो. या सर्वांशिवाय ज्या लोकांच्या कुटुंबात किडनी कॅन्सरची पूर्वीची प्रकरणे आहेत त्यांनाही जास्त धोका असतो.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.