Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पावणेदोन कोटींच्या दागिन्यांच्या फसवणूक प्रकरणी तरूणाला अटककेरळमध्ये सांगली एलसीबीची कारवाई

पावणेदोन कोटींच्या दागिन्यांच्या फसवणूक प्रकरणी तरूणाला अटक केरळमध्ये सांगली एलसीबीची कारवाई
 

सांगली: केरळमधील थ्रिसुर पूर्व येथील सराफाला हॉलमार्क करून दागिने देतो असे सांगून त्याच्याकडील पावणेदोन कोटींचे दागिने हडप करणाऱ्या सांगलीतील तरूणाला अटक करण्यात आली. केरळमध्ये एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली. 

विश्वास रामचंद्र कदम (वय ३४, रा. कौठुळी, ता. आटपाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. थ्रिसुर पूर्व येथील सदानंदन पोन्नापन यांचा सराफी व्यवसाय आहे. तर संशयित कदम आणि त्याची पत्नी स्नेहल कदम यांचे केरळमध्ये सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क करण्याचे दुकान आहे. सदानंदन याच्याकडून कदम याने एप्रिलमध्ये दागिने हॉलमार्क करून देतो असे सांगून पावणेदोन कोटींचे दागिने घेतले होते. परंतु त्याने ते दागिने परत न करता पळून गेल्याची तक्रार सदानंदन यांनी थ्रिसुर पूर्व पोलिस ठाण्यात दिली होती. 

त्या तक्रारीनुसार केरळमधील पोलिस कदम याच्या शोधासाठी सांगलीत आले होते. त्यानंतर सांगलीच्या एलसीबीच्या पथकाने त्याचा शोध सुरू केला. त्यावेळी पथकाला कदम भिवघाट (ता. खानापूर) येथे असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने ते दागिने थ्रिसुर येथेच विकल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला थ्रिसुर पूर्व पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 

एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक पंकज पवार, अनिल ऐनापुरे, अमोल ऐदाळे, सूर्यकांत साळुंखे, सुनिल जाधव, अभिजित ठाणेकर, रोहन गस्ते, कॅप्टन गुंडवाडे, करण परदेशी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.