Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खळबळजनक! रिपोर्ट आला, तिरुपती मंदिरातील प्रसादांच्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी, बीफ आढळल्याची पुष्टी

खळबळजनक! रिपोर्ट आला, तिरुपती मंदिरातील प्रसादांच्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी, बीफ आढळल्याची पुष्टी
 
 
लाखो लोकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या तिरुपती तिरुमला मंदिराबाबत मोठी बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध मंदिरात मिळणाऱ्या लाडूंमध्ये भेसळ होत असल्याचे समोर आले आहे.

राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाने लाडूंमध्ये चरबी आणि बीफ असल्याची पुष्टी केली आहे. राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या अहवालात खळबळजनक खुलासे करण्यात आले आहेत. बोर्डाच्या अहवालानुसार, तिरुपती मंदिरातील लाडू बनवण्यासाठी फिश ऑइल, बीफ आणि फॅटचा वापर करण्यात आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हे लाडू केवळ प्रसाद म्हणून भक्तांमध्येच वाटले जात नव्हते तर हे लाडू प्रसाद म्हणून देवालाही अर्पण केले जात होते.

मिळालेल्या माहितीनुसार, तिरुपती मंदिरातील लाडू आणि अन्नदानमच्या नमुन्यांच्या तपासणीत नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या अहवालात खळबळजनक खुलासे झाले आहेत. दुसरीकडे तिरुपती मंदिरात प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूवरून आंध्र प्रदेशात राजकीय वादळ उठले आहे. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी वायएस जगन मोहन रेड्डी यांना कोंडीत पकडले आणि आरोप केला की मागील वायएसआरसीपी सरकारने तिरुमला येथे तिरुपती लाडू प्रसादम तयार करण्यासाठी तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरली. हा प्रसाद भगवान व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात येणाऱ्या करोडो भाविकांना दिला जातो. सीएम नायडू यांनी आरोप केला होता की तिरुमलाचे लाडू देखील निकृष्ट घटकांपासून बनवले जातात.

सीएम चंद्राबाबू नायडू यांचा आरोप

अमरावती येथे एनडीए विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला संबोधित करताना मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी असेही सांगितले होते की, लाडू तयार करण्यासाठी आता शुद्ध तुपाचा वापर केला जात आहे आणि मंदिरातील प्रत्येक वस्तू स्वच्छ करण्यात आली आहे. यामुळे गुणवत्ता सुधारली आहे. आंध्र प्रदेशचे आयटी मंत्री नारा लोकेश यांनी X वर चंद्राबाबू नायडू यांची टिप्पणी शेअर करताना जगन मोहन रेड्डी यांना या मुद्द्यावर लक्ष्य केले आणि म्हणाले की YSRCP सरकार भक्तांच्या धार्मिक भावनांचा आदर करू शकत नाही. नारा लोकेश यांनी लिहिले, ‘तिरुमला येथील भगवान व्यंकटेश्वर स्वामी मंदिर हे आमचे सर्वात पवित्र मंदिर आहे. जगन प्रशासनाने तिरुपती प्रसादममध्ये तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरली हे जाणून मला आश्चर्य वाटले.

राजकीय वादळ
 
सीएम चंद्राबाबू नायडूंच्या या आरोपांमुळे आंध्र प्रदेशच्या राजकारणात वादळ निर्माण झाले आहे. या आरोपांना उत्तर देताना आंध्र प्रदेश काँग्रेस कमिटी  अध्यक्ष वायएस शर्मिला यांनी X वर लिहिले की चंद्राबाबू नायडू यांनी उच्चस्तरीय समिती स्थापन करावी आणि सीबीआयला सत्य शोधू द्यावे. दुसरीकडे, वायएसआरसीपीचे राज्यसभा खासदार वायव्ही सुब्बा रेड्डी यांनीही या वादावर प्रतिक्रिया दिली आणि म्हटले की नायडू राजकीय फायद्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. असे करून मुख्यमंत्र्यांनी तिरुमला मंदिराचे पावित्र्य आणि कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेला धक्का पोहोचला आहे, असेही ते म्हणाले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.