Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुन्हा पुन्हा टॉयलेटला जाऊनही पोट साफ होत नाही? बडीशेपचं 'असं' करा सेवन, मग बघा कमाल!

पुन्हा पुन्हा टॉयलेटला जाऊनही पोट साफ होत नाही? बडीशेपचं 'असं' करा सेवन, मग बघा कमाल!
 

तुम्ही अनेकदा लक्ष दिलं असेल की, तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला गेले आणि जेवण झाल्यावर तुम्हाला बडीशेप खायला दिली जाते. यामागे कारण आहे. जेवण झाल्यावर बडीशेप खाण्याचे अनेक फायदे होतात. बडीशेपचा वापर बरेच लोक मुखवास म्हणून करतात. पण याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. एक्सपर्ट सांगतात की, बडीशेप पचन तंत्रासाठी फायदेशीर असते. याच्या नियमित सेवनाने पचनासंबंधी अनेक समस्या दूर करण्यास मदत मिळते. आज आम्ही तुम्हाला बडीशेप खाण्याची योग्य पद्धत आणि काही फायदे सांगणार आहोत.

पचनक्रिया सुधारते

बडीशेपमध्ये असलेल्या फायबरने पचन तंत्र मजबूत करण्यास मदत मिळते. तसेच अपचन, गॅस आणि ब्लोटिंग म्हणजे पोट फुगण्याची समस्याही दूर होते. जेवण झाल्यावर बडीशेप खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होते. इतकंच नाही तर याने बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते.

अ‍ॅसिडिटी आणि पोटातील जळजळ होते दूर

बडीशेपमध्ये अ‍ॅंटी-अ‍ॅसिड गुण असतात, जे पोटातील अ‍ॅसिड संतुलित ठेवतात आणि अ‍ॅसिडिटीची समस्या दूर करतात. बडीशेपच्या सेवनाने पोटातील जळजळही दूर होते. भाजलेली बडीशेप खाल्ल्याने गॅस आणि पोट फुगण्याची समस्या दूर होते. याने आतड्यांमध्ये गॅस तयार होणं रोखलं जातं आणि पोटाला आराम मिळतो.

भूक नियंत्रित राहते

बडीशेपच्या सेवनाने भूक नियंत्रित राहते आणि ओव्हरइटिंगही टाळलं जातं. याने वजन कंट्रोल करण्यासही मदत मिळते. तसेच मासिक पाळी दरम्यान याचं सेवन केल्याने महिलांना वेदनाही कमी होतात.

भाजलेली बडीशेप खाण्याची पद्धत
- आधी बडीशेप कमी आसेवर हलकी भाजून घ्या. बडीशेप भाजताना रंग हलका सोनेरी व्हायला हवा आणि सुगंधही यायला हवा. भाजलेल्या बडीशेपने टेस्टही वाढते आणि याचे फायदेही वाढतात.
 
- दिवसातून साधारण एकदा भाजलेली बडीशेप जेवण झाल्यावर खावी. याने पचनक्रिया चांगली होते आणि पोटही साफ होतं. जेवण झाल्यावर ३० मिनिटांनी बडीशेप खावी किंवा रात्री जेवण झाल्यावर खावी.

- भाजलेली बडीशेप चावून खाल्ल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्यावे. याने पचनक्रिया आणखी चांगली होते. तसेच सकाळी पोट साफ होण्यासही मदत मिळते.

- भाजलेली बडीशेप एक सोपा आणि नॅचरल उपाय आहे. ज्यामुळे तुमचं पचन तंत्र मजबूत होतं. तुमचं पुन्हा पुन्हा टॉयलेटला जाऊनही पोट साफ होत नसेल तर हा उपाय तुम्ही करू शकता.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.