पुणे-हुबळी 'वंदेभारत एक्स्प्रेस' येत्या रविवारपासून धावणार; सातारा, सांगली, मिरजेत थांबणार
सांगली : ऐन गणेशोत्सवात पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना खूशखबर मिळाली आहे. रेल्वे मंत्रालयाने पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकला जोडणारी 'वंदेभारत एक्स्प्रेस' मंजूर केली आहे. हुबळी ते पुणे (गाडी क्र. २०६६९) व पुणे ते हुबळी (क्र. २०६७०) या दोन
गाड्या मिरज, सांगली, सातारामार्गे येत्या १५ सप्टेंबरपासून धावणार आहेत.
याबाबतची अधिसूचना रेल्वे मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे. पुणे-हुबळी वंदेभारत रेल्वे सुरू करून सांगली व मिरज येथे थांबा देण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे अनेकदा करण्यात आली होती. भाजपा महाराष्ट्र रेल प्रकोष्ठचे अध्यक्ष कैलास वर्मा यांनी पश्चिम महाराष्ट्रात रेल्वे विद्युतीकरण झाल्यानंतर वंदेभारत सुरू करण्याची मागणी रेल मंत्रालयाकडे केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पश्चिम महाराष्ट्रात सांगली स्थानकावर जलद रेल्वे गाड्या थांबवण्याची विनंती रेल्वेकडे केली होती. या मागणीचा विचार करून रेल्वे मंत्रालयाने हुबळी-पुणे मार्गावर दोन गाड्यांना मंजुरी देत सांगली स्थानकावर थांबा मंजूर केला आहे.
हुबळी ते पुणे अशी धावणार
हुबळीतून पहाटे पाच वाजता ही गाडी सुटून धारवाडला ५:१५ला, बेळगावला ६.५५, मिरजेत ९:१५ला, सांगलीत ९:३०ला, सातारा स्थानकावर १०:३५ तर पुण्यात दीड वाजता पोहोचेल.
पुण्यातून दुपारी २:१५ला सुटणारी वंदेभारत सातारा येथे ४:०८ला, सांगलीत ६:१०, मिरजेत ६:४५, बेळगावला ८:३५, धारवाडला १०:२० तर हुबळीत पावणेअकरा वाजता पोहोचेल.
'वंदेभारत एक्स्प्रेस'ची वैशिष्ट्ये
आठ कोचची संपूर्ण वातानुकूलित गाडीसोमवार सोडून रोज धावणार६६ किलोमीटर प्रतितास वेगअंतर ५५८ किलोमीटरकिती वेळात होणार प्रवासपुणे ते सांगली : ३.५५ ताससांगली ते बेळगाव : २.२३ ताससांगली ते हुबळी : ४.३३ तासबेळगाव ते हुबळी : २.१० तासपुणे ते हुबळी : साडे आठ तासकोल्हापूरसाठी पाठपुरावा सुरूच
कोल्हापूर ते मुंबई मार्गावर वंदेभारत एक्स्प्रेस मंजूर असून, विद्युतीकरणासह अन्य काही तांत्रिक कारणासाठी ती थांबवली आहे. लवकरच ही गाडी सुरू करण्यासाठी प्रयत्न करू. -उमेश शहा, सांगली रेल्वे डेव्हलपमेंट ग्रुप
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.