Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

प्रेयसीच्या मुलानं उलटी केल्यामुळे प्रियकराकडून चिमुकल्याची हत्या

प्रेयसीच्या मुलानं उलटी केल्यामुळे प्रियकराकडून चिमुकल्याची हत्या
 

पुणे: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. प्रेयसीच्या मुलानं उलटी केल्यामुळे प्रियकराकडून चिमुकल्याची हत्या करण्यात आली आहे. मुलाने उलटी केल्यामुळे ओरोपीकडून चिमुकल्याला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. एक सप्टेंबर रोजी ही घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.

 

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पुण्याच्या बिबेवाडी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे, प्रेयसीच्या मुलानं उलटी केल्यामुळे प्रियकराकडून चिमुकल्याची हत्या करण्यात आली आहे. चिमुकल्यानं उलटी केल्यामुळे प्रियकराकडून त्याला बेदम मारहाण करण्यात आली, या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. महेश कुंभार असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे.

 

समोर आलेल्या माहितीनुसार गेल्या तीन महिन्यांपासून आई आणि तिच्या प्रियकरासोबत हा चिमुकला पुण्यात राहात होता. त्याने उलटी केल्यानं आरोपीला राग आला, त्याला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे आईकडून मुलगा पलंगावरून पडल्याचा बनाव करण्यात आला मात्र शवविच्छेद अहवाल समोर येताच सत्य समोर आलं, पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.


 



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.