Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राष्ट्रवादी, शिवसेना व्हाया भाजपकडे वाटचाल! शिंदेंचा मोठा नेता 'कमळा'वर निवडणूक लढविणार?

राष्ट्रवादी, शिवसेना व्हाया भाजपकडे वाटचाल! शिंदेंचा मोठा नेता 'कमळा'वर निवडणूक लढविणार?
 

राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व्हाया एकनाथ शिंदे यांची शिवसेना, असा मंत्री उदय सामंत यांचा राजकीय प्रवास. मात्र, उदय सामंत हे पुन्हा नवीन पक्षात प्रवेश करणार का? अशी चर्चा रंगली आहे. त्याचं कारण ठरलं शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार राजन साळवी यांनी केलेलं विधान.

"उदय सामंत हे 2024 ची विधानसभा निवडणूक भाजपच्या 'कमळ' चिन्हावर लढतील," असा मोठा दावा आमदार साळवी  यांनी केला आहे. आमदार साळवी यांच्या विधानंतर कोकणासह महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे.

आमदार साळवी यांनी उदय सामंत  यांना रत्नागिरी मतदारसंघातून पराभूत करण्याचा विडाही उचलला आहे. त्यामुळे उदय सामंत भाजपकडून लढणार का? आमदार साळवी यांनी केलेला दाव्यावर काय उत्तर देणार? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

राजन साळवी काय म्हणाले?
"2014 आणि 2019 मध्ये राजन साळवी यांना उद्धव ठाकरे यांनी तिकीट दिलं. 2019 मध्ये निवडून आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सामंत यांना उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री केलं. एवढे देऊन सुद्धा सामंत उद्धव ठाकरे यांच्या पाठित खंजीर खुपसून शिंदे गटात गेले. आता 2024 मध्ये सामंत हे भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढतील," असं भाकीत आमदार साळवी यांनी व्यक्त केलं आहे.

"सामंत ना शरद पवारसाहेबांचे झाले ना उद्धव ठाकरे यांचे. आता ते एकनाथ शिंदे यांचेही होऊ शकणार नाहीत. मात्र, विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी मतदारसंघातून उदय सामंत यांना पराभूत करणार," असा निर्धार आमदार साळवी यांनी व्यक्त केला.
"शिवसैनिक, नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हाप्रमुख, उपनेता आणि तीनवेळा आमदार मी आहे. एका पक्षात, एका नेत्याच्या आणि एका झेंड्याच्या नेतृत्वाखाली मी 40 वर्षांचा प्रवास केला आहे. 24 पैकी 20 तास मी काम करतो. उदय सामंत हे स्वत:साठी पक्ष बदलत गेले. शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी मला अनेक प्रलोभने दिली गेली. चौकशा लावण्यात आल्या. पण, माझ्याकडून कधीही गद्दार झाली नाही आणि होणार नाही. उदय सामंत यांनी मला निष्ठेबद्दल शिकवू नये. 2024 ला राजन साळवी विजयाचा चौकार मारणार," असं आमदार साळवी यांनी ठणकावून सांगितलं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.