Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उपजिल्हाधिकारी मॅडमचे फोटो म्हणजे कहर, पण त्यांची कहाणी म्हणजे...

उपजिल्हाधिकारी मॅडमचे फोटो म्हणजे कहर, पण त्यांची कहाणी म्हणजे...
 

असं म्हणतात की अपयश माणसाला यशस्वी होण्यासाठी प्रेरणा आणि बळ देते. व्यक्ती अपयशातून शिकते आणि पुढे जाण्याची प्रेरणाही मिळते. हिमाचल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस मध्ये काम करणाऱ्या ओशिन शर्मा  या महिला अधिकाऱ्याच्या बाबतीत ही म्हण अगदी तंतोतंत खरी ठरते. ओशिन शर्मा या सध्या हिमाचल प्रदेशमध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून काम पाहतात. हिमाचल प्रशासकीय सेवा परीक्षेत ओशिन यांनी 10 वा क्रमांक पटकावला होता.

अनेक वेळा अयशस्वी

ओशिन शर्मा यांनी सरकारी नोकरीसाठी अनेक प्रयत्न केले आणि अनेक परीक्षा दिल्या होत्या. एकदा त्यांची सिव्हिल सर्व्हिसेससाठी निवडही होता-होता राहिली होती. कारण अवघ्या 5 गुणांनी त्यांची निवड होऊ शकली नव्हती, पण त्यांनी हार मानली नाही आणि 2019 मध्ये त्यांची BDO साठी निवड झालेली.

बीडीओ झाल्यानंतरही ओशिन यांनी आपली तयारी सोडली नाही आणि शेवटी दुसऱ्या प्रयत्नात त्या हिमाचल प्रशासकीय सेवेत (एचएएस परीक्षा) निवड झाली. या परीक्षेत त्यांनी दहावी रँक मिळवली. ओशिन शर्मा त्यांच्या प्रशासकीय कामामुळे जेवढ्या चर्चेत असतात तेवढ्याच त्या सोशल मीडियावरही लोकप्रिय आहेत. इन्स्टाग्राम, फेसबुक, यूट्यूबवरही त्यांचे फॉलोअर्स आहेत.

ओशिन शर्मा सांगतात की, कुटुंबात अभ्यासासाठी चांगले वातावरण होते. ओशिन या हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांचे वडील भुवनेश शर्मा हे नायब तहसीलदार होते आणि आई सेटलमेंट ऑफिसर, कांगडा येथे पीए म्हणून काम करत होत्या.

ओशिन सांगतात की, 'पूर्वी त्यांचे स्वप्न डॉक्टर बनण्याचे होते, त्यानंतर कॉलेजच्या दिवसात त्या विद्यार्थी राजकारणातही सक्रिय झाल्या होत्या, पण नंतर त्यांचा अभ्यासाकडे असलेला कल पाहून त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांनी प्रशासकीय सेवेतच जाण्याचा निश्चित केला. त्यासाठी त्यांनी जोरदार तयारी केली. ओशिन यांनी पंजाब विद्यापीठातून रसायनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.
तरुणांना करतात प्रेरित

ओशिन शर्मा या समाजसेवाही करत असून तरुणांमध्ये जनजागृती करत आहेत. अलीकडेच लाडली फाऊंडेशनने त्यांना ब्रँड ॲम्बेसेडरही बनवले आहे. त्या HAS परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी टिप्स देखील देतात. ओशिन शर्मा म्हणतात की, युवकांनी अपयशाने निराश होऊ नये आणि त्यांच्याकडून शिकले पाहिजे.

चित्रपटांच्याही ऑफर

ओशिन शर्मा सांगतात की, त्यांना चित्रपटांमध्ये काम करण्याच्या ऑफरही आल्या होत्या, पण त्यांच्या कुटुंबाला ते आवडले नाही. त्यामुळे त्या चित्रपटांमध्ये गेल्या नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.