आजीबाई आयुष्यभर दार रोखण्यासाठी वापरायच्या दगड; मृत्यूनंतर कळाली किंमत.. ९ कोटी!
नवी दिल्लीः हिऱ्याची खरी ओळख सोनारालाच कळते, असं म्हणतात. रोमानिया येथे ही म्हण खरी ठरणारी घटना घडली आहे. एका वृद्ध महिलेने आयुष्यभर ज्याला दगड समजून दरवाजा रोखण्याचं काम केलं. ते मात्र मुळाच बहुमूल्य अंबर निघालं.
वृद्धेच्या मृत्यूनंतर या धातूची पारख झाली.
स्पेनिश वृत्तपत्र 'एल पाईस'ने दिलेल्या माहितीनुसार, हे बहुमूल्य रत्न १.१ डॉलर म्हणजे साधारण ९ कोटी १३ लाख भारतीय रुपयांच्या बरोबरीचं आहे. मृत वृद्ध महिलेने हा अंबरचा तुकडा कोल्टी गावाजवळच्या नदी किनाऱ्यातून काही दशकांपूर्वी आणला होता.वृद्धेनं हा दगडाचा तुकडा असल्याचं समजून घराच्या उंबरठ्यावर ठेवला होता. जेव्हा चोर तिच्या घरी चोरी करण्यासाठी आले होते, तेसुद्धा या रत्नाची पारख करु शकले नव्हते. त्यामुळे त्यांनी केवळ सोन्याचे दागिने चोरुन नेले.
अंबराची मूळ किंमत महिलेल्या मृत्यूनंतर कळाली आहे. एका नातेवाईकाची नजर त्या दरवाजा रोखणाऱ्या तुकड्यावर पडली. त्याला थोडा संशय आला. त्याने खात्री केल्यानंतर रोमानिया सरकारला तो धातू विकला. सरकारने हे अंबर राष्ट्रीय खजाना म्हणून घोषित केलं आणि त्यापूर्वी त्याची तपासणी करण्यासाठी पोलंड इथल्या क्राकोव इतिहास संग्रहालयात पाठवलं. पोलंडच्या तज्ज्ञांनी या तुकड्याचा सखोल अभ्यास करुन हे अंबर ३८.५ ते ७० मिलियन वर्षे जुना असल्याचं स्पष्ट झालं.बुजाऊच्या विभागीय संग्रहालयाचे संचालक डेनियल कोस्टाचे यांच्या सांगण्यानुसार, हा अंबराचा तुकडा वैज्ञानिक आणि संग्रहालय या दोन्ही पातळ्यांवर अत्यंत मौल्यवान आहे. हा जगातल्या सगळ्यात मोठ्या तुकड्यांपैकी एक आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.