भर दिवसा कार्यालयाचं शटर केलं बंद, काँग्रेसचा पदाधिकारी सापडला महिलेसोबत नको त्या अवस्थेत, जमावाने धू धू धुतला
खेड: राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. अनेक इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहे. पण खेडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आमदारकीचं स्वप्न पाहणाऱ्या एका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला मुलीसोबत ऑफिसमध्ये नको त्या अवस्थेत लोकांनी पकडलं.
त्यानंतर जमावाने या पदाधिकाऱ्याची चांगलीच धुलाई केली. हा पदाधिकारी काँग्रेसचा असल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातल्या एका मोठ्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्याचं कांड समोर आलं आहे. खेड शहरातील कार्यालयात हा पदाधिकारी एका महिलेसोबत होता. धक्कादायक म्हणजे, भर दिवसा कार्यालयाचे दरवाजे बंद करून हा पीडित महिलेसोबत आत होता. गेल्या काही दिवसांपासून या पदाधिकाऱ्याच्या वागणुकीवर स्थानिकांना संशय होता. आज हा पदाधिकारी नेहमी प्रमाणे कार्यालयात आला होता. पीडित महिला ही याच कार्यालयामध्ये कामाला होती. दुपारच्या वेळी परिसरात वर्दळ कमी झाल्याचं लक्षात आल्यावर त्याने कार्यालयाचं शटर बंद केलं.
भर दिवसा कार्यालयाचं शटर आतून कोणी का बंद केलं, याचा संशय स्थानिकांना आला. या महिलेच्या निकटवर्तीयांनी कार्यालयावर पोहोचले आणि शटर उघडून आत गेले. तेव्हा दोघेही नको त्या अवस्थेत आढळून आले. त्यामुळे संतापलेल्या जमावाने या पदाधिकाऱ्याला चांगलाच चोप दिला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जमावाच्या तावडीतून या पदाधिकाऱ्याला ताब्यात घेतलं. कार्यालयापासून हाकेच्या अंतरावरच पोलीस स्टेशन आहे. पोलीस या पदाधिकाऱ्याला पोलीस स्टेशनला घेऊन जात होते, तेव्हा पुन्हा एकदा संतप्त जमावाने या पदाधिकाऱ्यावर हल्ला केला. भर रस्त्यावर जमावाने त्याला बेदम मारहाण केली त्याच परिस्थितीत त्या पदाधिकाऱ्याला खेड पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे. खेडच्या पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली असून काहीकाळ वातावरण तणावग्रस्त होतं.विशेष म्हणजे, हा पदाधिकारी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून लढण्यासाठी इच्छुक आहे. त्याने तशी तयारी सुद्धा सुरू केली आहे. अशातच कार्यालयातलं कांड समोर आल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.