प्रकाश कांबळे यांच्या पत्रकारितेकडे पाहिले की त्यांनी सामाजिक बांधिलकीचे भान कधीही सुटू दिलेले नाही.
सांगली दिं.४ प्रकाश कांबळे यांच्या पत्रकारितेकडे पाहिले की त्यांनी सामाजिक बांधिलकीचे भान कधीही सुटू दिलेले नाही. त्यामुळे त्यांना मिळालेला स्व.बाळासाहेब गलगले हा पुरस्कार निश्चित योग्य आहे.अशा शब्दात राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी गौरव करत पुरस्कारप्राप्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. बाळासाहेब गलगले यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त येथील लोकमान्य टिळक स्मारक मंदिरात आयोजित सेवा पुरस्काराचे वितरण आमदार सदाभाऊ खोत यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार नितीन शिंदे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पै.पृथ्वीराज पवार उपस्थित होते.
आमदार सदाभाऊ खोत म्हणाले, बाळासाहेब गलगले यांनी आयुष्यभर उपेक्षित, वंचित, तळागाळातील घटकासाठी सातत्यपूर्ण काम केले. कसल्याही पदाची अपेक्षा केली नाही. त्यांचाच आदर्श घेत आम्ही समाजकारण करत आहोत. त्यांच्या नावाने दिला जाणारा हा सेवा पुरस्कार निश्चित समाजातील विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करण्याचा रास्त गौरव करणारा असा आहे.
यावेळी हिंदू धर्म रक्षक पुरस्कार मनोहर सारडा यांना तर सहकार सेवा पुरस्कार कर्मवीर पतसंस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, आणि नगरसेवक पुरस्कार आष्ट्याचे माजी नगरसेवक वीर कुदळे,तसेच क्रीडा सेवा पुरस्कार शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या महिला बॅडमिंटनपटू माणिकताई परांजपे आणि शाहिरी सेवा पुरस्कार अनंत कुमार साळुंखे यांना तर स्वच्छतादूत सतीश दुधाळ यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी मनोहर सारडा, रावसाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. तर फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास कुलकर्णी यांनी या पुरस्कारामागची भावना व्यक्त केली. या कार्यक्रमास श्रीकांत शिंदे, रजनी गोखले, सुभाष खराडे ,अतुल कुलकर्णी रवींद्र वाजवणे श्रीवल्लभ कुलकर्णी, शुभम पत्की ,निरंजन कुलकर्णी, शैलेश पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय कडणे यांनी केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.