Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अजित पवार बारामतीतूनच लढणार..! अजित पवार गटातील २५ संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर

अजित पवार बारामतीतूनच लढणार..! अजित पवार गटातील २५ संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर
 

बारामती विधानसभेतून अजित पवार लढणार की नाही ? यावर गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. मात्र अजित पवार बारामतीतूनच लढणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे. अजित पवार गटाची आज एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार बारामतीतूनच लढणार असल्याचे जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आला. यातच आता आगामी विधानसभा निवडणूकीसाठी अजित पवार गटातील संभाव्य २५ जणांची यादी समोर आली आहे.

लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार बारामतीतून लढणार नसल्याच्या चर्चा होत्या. मात्र अजित पवार बारामतीतूनच लढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यातच छगन भुजबळ येवला, दिलीप वळेस पाटील आंबेगाव मुंडे परळी कागलमधून कागलमधून हसन मुश्रीफ, दिंडोरी विधानसभेतून नरहरी झिरवळ यांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार आहे. त्याचबरोबर रायगडमधून अदिती तटकरे, अहमदनगरमधून संग्राम जगताप, खेड-आळंदीतून दिलीप मोहिते पाटील, अहेरीतून धर्मरावबाबा आत्राम, कळवणमधून नितीन पवार, इंदापूरमधून दत्ता मामा भरणे यांना उमेदवारी दिली जाणार आहे.

उदगीरमधून माजी मंत्री संजय बनसोडे यांना पुन्हा संधी दिली जाणार आहे. तसेच पुसदमधून इंद्रनील नाईक, वाई- खंडाळ्यातून मकरंद बाबा पाटील, पिंपरीतून अण्णा बनसोडे, मावळमधून सुनील शेळके, अमळनेरमधून अनिल पाटील, जुन्नरमधून अतुल बेनके, वडगाव शेरीतून सुनील टिंगरे, हडपसरमधून चेतन तुपे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात येणार असल्याचे बोललं जात आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणूकीत मोठा फटका बसल्यामुळे अजित पवारांनी विधानसभेला मोठी काळजी घेण्यास सुरूवात केली आहे. आपले हक्काचे आमदार दुसऱ्या पक्षात जाऊ नये म्हणून अजित पवार स्वतः लक्ष घालून आहेत. यातच जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून अर्जित पवार महायुतीत आपल्या वाट्याला येणाऱ्या मतदारसंघात प्रचार करतांना दिसत आहेत. त्याचवेळी विद्यमान आमदारांना पुन्हा संधी द्या. असेही आवाहून अजित पवार यांच्याकडून नागरिकांना करण्यात येत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.