Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विवाहितेची चार वर्षीय मुलासह आत्महत्या; "हे" कारण आले समोर

विवाहितेची चार वर्षीय मुलासह आत्महत्या; "हे" कारण आले समोर
 

दिंडोरी: तालुक्यातील रासेगाव येथील एका विवाहितेने आपल्या 4 वर्षीय मुलासह विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दिंडोरी तालुक्यातील रासेगाव येथील अश्विनी समाधान ढगे (वय 23) या विवाहितेने आपला चार वर्षाचा मुलगा रियांश समाधान ढगे (वय 4) याच्यासह विहीरीत आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मृत अश्विनी हिचे वडील परशराम आबाजी पाटील रा. निळवंडी ता. दिंडोरी यांच्या फिर्यादीनुसार जावई समाधान ढगे याचे बाहेर अनैतिक संबंध होते, त्याला अश्विनी विरोध करत होती, या कारणावरून तसेच माहेरहून दोन लाख रुपये आणावे यासाठी सासु व नवरा यांच्याकडून अश्विनीचा शारीरिक व मानसिक छळ चालू होता. 

त्यामुळे सासरच्या जाचाच कंटाळून तिने आत्महत्या केल्याची फिर्याद अश्विनीचे वडील परसराम पाटील यांनी दिली आहे. याबाबत दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पती समाधान भिकाजी ढगे व सासू लिलाबाई भिकाजी ढगे रा. राशेगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पोलिस करीत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.