अति दारु प्यायल्याने व्यक्तीचा कापावा लागला प्रायव्हेट पार्ट, डॉक्टरांनी सांगितल
मद्यपान आरोग्यासाठी नुकसानदायक असतं. हे माहिती असूनही अनेक जण मद्याच्या व्यसनाच्या आहारी जातात. एका व्यक्तीला मद्यपानाचं व्यसन चांगलंच महागात पडलं. जास्त प्रमाणात आणि सातत्याने मद्यपान केल्याने या व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट अर्थात गुप्तांग खराब झालं आणि डॉक्टरांना शस्त्रक्रिया करून ते कापून टाकण्याचा निर्णय घ्यावा लागला.
याविषयी अधिक माहिती घेऊ या.
काही जण मद्यपानाच्या इतके आहारी जातात, की कोणत्याही परिस्थितीत ते दारूपासून लांब राहू शकत नाहीत. अशा व्यक्ती शेवटी गंभीर आजाराला बळी पडतात. एका व्यक्तीला जास्त मद्यपान केल्याने रुग्णालयात दाखल व्हावं लागलं आणि डॉक्टरांनी त्याच्या गुप्तांगावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
'द मिरर'च्या वृत्तानुसार, 65 वर्षांची एक व्यक्ती तीव्र ताप आल्याने रुग्णालयात दाखल झाली.डॉक्टरांनी तपासणी केली असता, व्यक्तीच्या गुप्तांगात संसर्ग झाला होता, असं दिसून आलं. त्यामुळे डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले आणि त्याला इंजेक्शन दिलं; पण त्याची प्रकृती अधिकच खालावली. रुग्णाला बरं न वाटल्याने तो परत डॉक्टरांकडे गेला. त्या वेळी डॉक्टरांनी त्याचं गु्प्तांग कापण्याचा निर्णय घेतला. त्याच्या गु्प्तांगात गँगरीन झालं होतं. त्यामुळे त्यातल्या पेशी काळ्या पडल्या होत्या. अति मद्यपानामुळे गँगरीन आणि मूत्रविसर्जनाशी संबंधित समस्या निर्माण होतात, असं डॉक्टरांनी सांगितलं.डॉक्टरांनी सांगितलं, की 'या व्यक्तीच्या लिंगावर इस्केमिक गँगरीन होणं ही दुर्मीळ घटना आहे. कारण या अवयवात पुरेसा रक्तपुरवठा होत असतो.' रुग्णाला डॉक्टरांनी या आजाराची माहिती देऊन उपचार सांगितले. रुग्णाने उपचारांना सहमती दर्शवली. ही व्यक्ती जास्त मद्यपान करत असल्याने गँगरीन झालं, असं सांगितलं जात आहे.अशा प्रकारची गंभीर जोखीम कमी करण्यासाठी मूत्ररोगतज्ज्ञाचा तात्काळ सल्ला घ्यावा. गँगरीन ही अशी स्थिती आहे, ज्यात रक्तप्रवाह कमी झाल्याने शरीरातल्या पेशी मरतात. हे प्रामुख्याने कोरडेपणा, ओलसरपणा आणि गॅस अशा तीन प्रकारे परिणाम करते. यावरून मद्यपान हे आरोग्यासाठी धोकादायक असल्याचं दिसून येतं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.