Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तीनदा वॉर्निंग देऊनही अधिकाऱ्यांच्या बदल्या का थांबवल्या? निवडणूक आयोगाने महाराष्ट्र सरकारला झापलं

तीनदा वॉर्निंग देऊनही अधिकाऱ्यांच्या बदल्या का थांबवल्या? निवडणूक आयोगाने महाराष्ट्र सरकारला झापलं
 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तायरीला वेग आला आहे. निवडणूक आयोगाचे अधिकारी महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र सरकारला झापलं आहे.

तीनदा वॉर्गिंन देऊनही अधिकाऱ्यांच्या बदल्या का थांबवल्या? असा सवाल निवडणूक आयोगाने महाराष्ट्र सरकारला विचारला आहे.  निवडणुक अधिकाऱ्यांनी CEO, SPNO, नोडल ऑफिसर आणि CPMF अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. केंद्रीय निवडणूक आयोगाच महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या बदल्या बाबत केलेल्या सूचनांचा अहवाल न दिल्याने निवडणूक आयोगाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रसह निवडणुका होणाऱ्या इतर चार राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहले होते. एकाच जागी तीन वर्षापेक्षा जास्त काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण आयोगाच्या पत्राकडे दुर्लक्ष केल्याने आयोगाने नाराजी दर्शवली आहे. दिलेल्या कालावधीत या सगळ्याची माहिती का दिली नाही हे स्पष्ट करण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. तीन वेळा स्मरणपत्र पाठवूनही राज्य सरकारकडून कुठलही उत्तर आलेले नाही. यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
या दौऱ्यादरम्यान निवडणूक आयोग राजकीय पक्षासोबत देखील बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही शिवसेना, भाजप, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे आणि आम आदमी पक्षाच्या सदस्यांनी हजेरी लावत निवडणुकीच्या संदर्भात आपल्या भूमिका स्पष्ट केल्या. तसेच काही सूचनाही दिल्या..

वरिष्ठ नागरिकांची वयोमर्यादा 85 वर्षावरून 80 वर्ष करण्यात यावी. त्यामुळे या वरिष्ठ नागरिकांना घरी मतदानांची सोय करता येईल,अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी निवडणूक आयोगाकडे केलीय. तसेच उमेदवार खर्च मर्यादा 15 लाख रुपयांनं वाढवावी,अशी मागणीही केली शेवाळे यांनी केलीय.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.