Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

देशातील सर्वांत श्रीमंत महिलेला भाजपने नाकारलं तिकीट,आता अपक्ष लढणार!

देशातील सर्वांत श्रीमंत महिलेला भाजपने नाकारलं तिकीट,आता अपक्ष लढणार!
 

हिस्सार: हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने बुधवारी संध्याकाळी 67 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर पक्षात फुट पडण्यास सुरुवात झाली आहे. अनेक पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावरच राजीनामे दिले आहेत.

देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदल यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. सावित्री या हिस्सारमधून अपक्ष लढणार आहेत. 'मी भारतीय जनता पक्षाची प्राथमिक सदस्य नाही. मात्र तुमचं प्रेम आणि विश्वास बघून मी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे,' असं त्यांनी आपल्या समर्थकांना सांगितलं. सावित्री या प्रसिद्ध उद्योगपती आणि भाजपचे कुरुक्षेत्र येथील खासदार नवीन जिंदल यांच्या आई आहेत. हिस्सार येथून त्या भाजपच्या मंत्री डॉ. कमल गुप्ता यांच्या विरोधात निवडणूक लढवतील.

सावित्री जिंदल यांनी हिस्सारमधून निवडणूक लढवली तर त्या विरोधकांना जोरदार टक्कर देतील. जिंदल कुटुंब 1991 पासून हिस्सारमधून निवडणूक लढवत आहे. दिवंगत ओ. पी. जिंदल यांनी चौधरी बन्सीलाल यांच्या हरियाणा विकास पार्टीच्या तिकिटावर हिस्सारमधून निवडणूक लढवली आणि विजयही मिळवला. या कुटुंबाने राजकारणाबरोबरच हिस्सारमध्ये अनेक लोकोपयोगी कामं केली आहेत. याव्यतिरिक्त जिंदल इंडस्ट्रीजमध्ये अनेक स्थानिक लोकांना रोजगारही मिळाले आहेत. त्यामुळे जिंदल कुटुंबाची मोठी व्होटबॅंक हिस्सारमध्ये आहे. डॉ. कमल गुप्ता यांच्या विरोधात हिस्सारमध्ये असलेल्या नाराजीचा सावित्री यांना निवडणुकीत फायदा मिळू शकतो.
सावित्री या देशातील चौथ्या क्रमांकाच्या श्रीमंत महिला आहेत. दिवंगत स्टील किंग ओ. पी. जिंदल यांच्या त्या पत्नी आहेत. जिंदल हे शेतकरी कुटुंबातील होते. सहावीपर्यंत शिकलेल्या जिंदल यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात स्टील उद्योगाला सुरुवात केली. 2005 मध्ये हेलिकॉप्टर ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या चार मुलांमध्ये उद्योगधंद्यांच्या वाटण्या झाल्या. सावित्री यांनी उद्योगधंद्यात लक्ष घातलं आणि राजकारणातही आपलं नशीब आजमावलं. फॉर्च्युन इंडियाने प्रसिद्ध केलेल्या सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत त्यांचा समावेश आहे. सावित्री या 2.77 कोटी रुपयांच्या मालक आहेत. फॉर्च्युन इंडियाच्या टॉप टेनमध्ये त्यांचा 10 वा क्रमांक आहे. हरियाणात कॅबिनेट मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे.

ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सनुसार जिंदल ग्रुपच्या अध्यक्षा सावित्री ज्यांच्या संपत्तीत दोन वर्षांत प्रचंड वाढ झाली आहे. 2020 मध्ये फोर्ब्जच्या यादीत त्या 349 व्या क्रमांकावर होत्या. 2021 मध्ये त्या 234 व्या तर 2022 मध्ये 91 व्या नंबरवर पोहोचल्या.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.