मुंबई :- बिस्कीट उचलण्यासाठी धावला अन् ब्लेड गळ्याला लागलं, ३ वर्षाच्या आयुष्यचा मृत्यू, आई-वडिलांना होता एकुलता एक
अंबरनाथ : आई सोबत गेलेल्या ३ वर्षाच्या चिमुरडयाचा कंपनीतील सुरू असलेल्या बिस्कीट बनवणाऱ्या मशीनचा ब्लेट गळ्याला लागून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मशीनच्या ब्लेट वरून जाणारे बिस्किट उचलण्यासाठी हा चिमुरडा गेला असता ही घटना घडली आहे.
ही घटना अंबरनाथ आनंद नगर भागात असलेल्या एमआयडीसी मधील एका बिस्कीट कंपीनीत घडली आहे. याप्रकरणी अंबरनाथ पूर्वेतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आयुष्य चौहान (वय ३) असे मृतक चिमुरड्याचे नाव आहे. विशेष म्हणजे तो आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक आयुष्य हा अंबरनाथ पूर्वेतील आनंद नगर एमआयडीसी नजीक असलेल्या ठाकूर पाडा भागातील एका चाळीत आईवडिलांसह राहत होता. तो मूळचा बिहार राज्यातील असून मृतकची आई पूजा कुमारी नितेश चौहान (वय २२) ही उपजीविकेसाठी बिस्कीट कंपनीतील ५ ते ६ कामगारांना जेवणाचे डब्बे पुरवत आहे.
नेहमीप्रमाणे आज ३ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास आनंद नगर एमआयडीसी भागातील चिखलोली प्लॉट क्रमांक 40, 41 येथील बिस्कीट बनविणाऱ्या राधे कृष्ण कंपनीत मृतक मुलासोबत जेवणाचे डब्बे देण्यासाठी गेली होती. त्याच सुमाराला मृतक आयुष्याला सुरू असलेल्या मशीनच्या ब्लेटवरून बिस्किटे एका मागून एक जात असतानाच, त्यामधील एक बिस्कीट उचलण्यासाठी वाकताच त्याच्या गळ्याला बेल्ट लागून तो गंभीर जखमी झाला.
दरम्यान, ही घटना पाहून कंपनीमधील कामगारांनी मशीन बंद करत चिमुरड्याला उल्हासनगर मधील मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला या घटनेमुळे चिमुरडा राहत असलेल्या भागात हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे तो आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता.याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्याशी संपर्क साधला असता, मृतक मुलाची आई कंपनीतील कामगारांना जेवणाचे डब्बे पुरवत असून घटनेच्या दिवशी मयत मुलगा हा तिच्या सोबत आला होता. तो चालू मशीनच्या बेल्ट मधून बिस्कीट उचलत असतानाच हा अपघात घडला आहे. त्याची २२ वर्षीय आई पूजा कुमारी चौहान यांच्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केल्याचे सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.