Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शिवालयात गेल्यावर तीन टाळ्या वाजवत असाल तर थांबा! या चूका टाळा, तीन टाळ्यांचा अर्थ काय?

शिवालयात गेल्यावर तीन टाळ्या वाजवत असाल तर थांबा! या चूका टाळा, तीन टाळ्यांचा अर्थ काय?
 

हिंदू कालगणनेनुसार भाद्रपद महिन्यात शिवपार्वती पूजनासह हरतालिकेसारखी अनेक व्रतेही केली जातात. भाविक शिवालयात जाऊन शंकराला चांगल्या संततीसाठी, आयुष्यासाठी प्रार्थना करतात. शिवालयात अनेकदा आपण पाहिले असेल भाविक मोठ्या श्रद्धेने शंकराची पूजा करतात आणि तीन टाळ्या वाजवतात. बम बम भोले म्हणत केल्या जाणाऱ्या या टाळ्यांचा अर्थ काय? अनेकजण या तीनही टाळ्या एकदाच वाजवताना दिसतात.

हिंदू धर्मात प्रत्येक शास्त्रामागे अर्थ दडलेला असून शिवालयात तीन टाळ्या वाजवण्यामागे काय शास्त्र आहे? अनेकजण सलग तीन टाळ्या वाजवतात. पण शिवलिंगासमोर सलग तीन टाळ्या वाजवणे योग्य नसल्याचं शास्त्राकार सांगतात. काय आहे अर्थ? शिवालयात टाळ्या वाजवण्याची योग्य पद्धत काय?

 

शिवालयातील तीन टाळ्यांना आहे अर्थ

शिवालयात गेल्यावर शंकरासमोर अनेक भाविक घाई घाईत सलग तीन टाळ्या वाजवतात . पण ही पद्धत योग्य नसल्याचं शास्त्राकार सांगतात . या टाळ्यांमध्येही अर्थ असल्याचं सांगितलं जातो. शिवलिंगाला नमस्कार करून झाल्यावर तीन टाळ्या वाजवण्याचा प्रयोग केला जातो. या तीनही टाळ्यांना आपल्या उपस्थितीचा, इच्छेचा आणि आपल्यावर कृपादृष्टी ठेवण्यास सांगणे असे अर्थ आहेत.

पहिल्या टाळीचा अर्थ काय?

पहिला टाळी चा अर्थ असा की शिवालयात गेल्यावर आपल्या अस्तित्वाची आणि शिवालयातील आपल्या उपस्थितीची नोंद करणारी ही टाळी आहे . ही टाळी वाजवताना भगवान शंकराला मी तुझ्या दारात आलो आहे माझ्याकडे लक्ष दे असं सांगत असतो अनेकदा भाविक मोठ्या कष्टाने यात्रेला किंवा महादेवाच्या श्रद्धास्थानी मजल दरमजल करत आलेले असतात . मोठ्या पल्याचा प्रवास करत अनेकांनी मंदिरात किंवा शिवालयात पाऊल ठेवलेले असते एवढ्या कष्टातून तुझ्या दारी आलो असं सांगण्यासाठी पहिली टाळी वाजवली जाते

दुसऱ्या टाळी मागे काय अर्थ ?

दुसऱ्या टाळी चा अर्थ शास्त्राकारांनी असा सांगितलाय की शिवासमोर एखादी इच्छा मागताना आपल्या अज्ञानाची आपल्याला जाणीव असल्याचा सांगणे म्हणजे दुसरी टाळी . यावेळी आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्यावर लक्ष ठेवण्यासाठी शिवाला सांगण्यासाठी दुसरी टाळी वाजवली जाते.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.