Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'साहेबांना सोडणं ही माझी मोठी चूक' जाहीर सभेत अजित पवारांची कबुली

'साहेबांना सोडणं ही माझी मोठी चूक' जाहीर सभेत अजित पवारांची कबुली
 

राज्यातील विधानसभा निवडणूकी आधी राजकीय समीकरण बदलतांना दिसत आहे. शरद पवार गटात अजित पवार गटातील नेत्यांनी प्रवेश केला असून येत्या काळात ही बेरीज सुरूच राहणार आहे. यामुळे अजित पवार यांचे टेंशन वाढल्याचे दिसून येत आहे.

चर्चा अशीही आहे की गडचिरोलीचे नेते राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांची लेक भाग्यश्री आत्राम- हलगेकर लवकरच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. यावरून राजकारणही तापले आहे.

अशात आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे. त्यात सर्व नेते मंडळी आपली ताकद दाखवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सर्व नेतेमंडळींकडून राज्याचा दौरा सुरु आहे.

अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सध्या विदर्भातील गडचिरोलीत आहे. आणि यादरम्यान त्यांनी माध्यमांशी बोलतांना यावर प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,’वडिलांचं जितकं प्रेम आपल्या लेकीवर असतं. तेवढं लेकीवर प्रेम कुणीच करू शकत नाही. असं असताना तुम्ही घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहात, हे बरोबर नाही. समाजाला हे आवडत नाही. याचा अनुभव आम्ही पण घेतलेला आहे. साहेबांना सोडणं ही माझी मोठी चूक होती, मी हे मान्य केली आहे, असं अजित पवार म्हणाले.

दरम्यान, अजित पवारांनी काका शरद पवारांची साथ सोडली ते महायुतीत सहभागी झाले. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षासह पवार कुटुंबात फूट पडली. काहींनी अजित पवारांच्या निर्णयाला पाठिंबा दिला. तर काहींनी त्यांचा कडाडून विरोध केला. पण या निर्णयाबद्दल स्वत: अजित पवारांना काय वाटतं? महायुतीत सहभागी झाल्यानंतर वर्षभराने अजित पवार यावर बोलते झाले

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.