Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

घरात या दिशेला तोंड करुन चुकून गणपतीची मूर्ती ठेवू नका, अन्यथा अनर्थ ओढावेल...

घरात या दिशेला तोंड करुन चुकून गणपतीची मूर्ती ठेवू नका, अन्यथा अनर्थ ओढावेल...
 

घरात देवाची मूर्ती किंवा फोटो लावताना ती कोणत्या दिशेला असावी, याची अनेकांना ज्ञान नसते. अशावेळी चुकीच्या दिशेला देवाचा फोटो लागल्यास घरावर अरिष्ट ओढावण्याची शक्यता असते.

सनातन धर्मात देवाची प्रतिष्ठापना, त्याच्या बसण्याची जागा, देव्हारा किंवा देवाचा फोटो कोणत्या दिशेला तोंड करुन आहे, अशा बारीकसारीक गोष्टींना अनन्यासाधारण महत्त्व असते. या सगळ्या गोष्टी अचूक पाळल्यास संबंधित देवतेची कृपादृष्टी घरावर कायम राहते. 

गपणती हे आराध्य दैवत मानले जाते. कोणत्याही शुभकार्याची किंवा कोणत्याही पूजाविधीची सुरुवात करतानाही सुरुवातीला गणपतीचे नामस्मरण केले जाते. महाराष्ट्रात एकंदरित विचार केल्यास गणपती  ही इष्टदेवता आहे. त्यामुळे अनेक घरांच्या देव्हाऱ्यात आणि भिंतीवर गणपतीचा फोटो लावला जातो. मात्र, या फोटोचे तोंड कोणत्या दिशेला असावे, याबाबत बऱ्याचदा संभ्रम पाहायला मिळतो. याशिवाय, एखाद्या कुटुंबाने घरात पहिल्यांदाच गणपती बसवायचा ठरवले तर तो कोणत्या दिशेला असावा, याबाबतही अनेकांना प्रश्न पडतात. वास्तुशास्त्रानुसार याचे काही नियम ठरवून देण्यात आले आहेत. हे नियम पाळल्यास आपल्याला घरात किंवा कार्यालयात सकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकतात.

ऑफिसमध्ये गणपतीची कोणती मूर्ती किंवा तसबीर लावाल?

तुम्हाला ऑफिसमध्ये गणपतीची मूर्ती किंवा तसबीर लावायची असेल तर उभा असलेल्या गणपतीची तसबीर योग्य ठरते. यामुळे तुमच्या कार्यालयातील वास्तू दोष दूर होण्यास मदत होईल. मात्र, हे करताना एक गोष्ट ध्यानात ठेवावी ती म्हणजे गणपतीची मूर्ती किंवा तसबिरीचे तोंड चुकूनही दक्षिण दिशेला असू नये. त्यामुळे त्रास सहन करावा लागू शकतो.

गणपतीच्या कोणत्या रंगाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी?

वास्तूशास्त्रामध्ये गणपतीच्या मूर्तीचा रंग कोणता असावा, याबाबतही काही आडाखे ठरवून देण्यात आले आहेत. तुम्हाला घरात गणपतीची मूर्ती ठेवायची असेल तर तिचा रंग शुभ्र सफेद असावा. त्यामुळे घरातील वास्तूदोष कमी होतील. याशिवाय, घरात केशरी रंगाची मूर्ती ठेवल्यास अनेक लाभ मिळतात. मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी घरात पिवळ्या किंवा फिकट रंगाचा गणपतीची फोटो मुलांच्या अभ्यासाच्या टेबलवर ठेवावा. 

गणपतीच्या फोटोसाठी योग्य दिशा कोणती?

वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर कोपऱ्यातील जागा गणपतीची मूर्ती लावण्यासाठी योग्य मानली जाते. चुकूनही गणपतीचा फोटो घराच्या दक्षिण कोपऱ्यात लावू नये. अन्यथा अनर्थ घडण्याची शक्यता असते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.