Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

इको आणि पिकअप गाडीची समोरासमोर धडक, सहा जण जागीच ठार, ४ गंभीर जखमी

इको आणि पिकअप गाडीची समोरासमोर धडक, सहा जण जागीच ठार, ४ गंभीर जखमी
 

शिनंदखेडा : शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाट्याजवळ इको आणि पिकअप गाडीची समोरासमोर धडक झाली. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भयंकर होता की, यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. तसेच, या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाट्याजवळ रात्री दोन वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. नरडाणा येथे भागवत कथेचा कार्यक्रम आटपून परतताना इको व्हॅनला दसवेल फाट्याजवळ भरधाव मालवाहतूक बोलरो पिकअपने त्यांच्या व्हॅनला जोरदार धडक दिली. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. चार गंभीर गंभीर जखमी झाला आहे. जागीच मृत्यू झालेल्यांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. जखमींवर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, धक्कादायक म्हणजे पिकअप चालवणारा चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे धुळे जिल्ह्यावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पोलीस तपास सुरु आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.