Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गोळीबारानंतर कोयत्याने वार, पुण्याच्या पेठेत आंदेकरला संपवलं

गोळीबारानंतर कोयत्याने वार, पुण्याच्या पेठेत आंदेकरला संपवलं
 

पुणे :- गणेशोत्सवाच्या तोंडावर पुण्यातल्या पेठेत गोळीबार झाला आहे. या गोळीबारामध्ये वनराज आंदेकरचा मृत्यू झाला आहे. रात्री 9.45 च्या सुमारास वनराज आंदेकरवर पाच ते सहा गोळ्या झाडल्या गेल्या, यानंतर दुचाकींवरून आलेल्या हल्लेखोरांनी आंदेकरवर कोयत्याने वारही केले.

धक्कादायक बाब म्हणजे आंदेकरवर हल्ला करायच्या आधी नाना पेठ भागातील लाईटही गेले होते. सख्ख्या दाजीनेच आंदेकरची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. हल्ला झाल्यानंतर आंदेकरला तातडीने केईएम रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. वनराज आंदेकरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर नाना पेठेत जिकडे हा गोळीबार झाला त्याठिकाणी स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेची टीम पोहोचली आहे.

वनराज आंदेकरवर हल्ला करणाऱ्यांमध्ये गणेश लक्ष्मण कोमकर, सोमनाथ सयाजी गायकवाड, तुषार आबा कदम अशी संशयितांची नावं आहे. पोलीस सध्या मारेकऱ्यांच्या शोधात आहेत. यातला गणेश लक्ष्मण कोमकर हा वनराज आंदेकरचा दाजी आहे.

घरगुती वादातून बंडू आंदेकरचा जावई गणेश कोमकर याने फायरिंग केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आंदेकर कुटुंबाने कोमकर कुटुंबाला एक दुकान चालवायला दिलं होतं, पण या दुकानावर पुणे मनपाने अतिक्रमण कारवाईमध्ये पाडलं. या रागातून सख्ख्या दाजीने वनराज आंदेकरची हत्या केल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे. आंदेकर कुटुंबातील मुलगी लग्न करून कोमकर कुटुंबात दिली होती, वरून त्यांना घर आणि दुकानही चालवायला दिलं होतं, पण दुकानावर कारवाई झाल्यामुळे कोमकरने आंदेकरवर हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.