Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कागलमधील घाटगे-मुश्रीफ लढतीत तिसऱ्या भिडूची एंट्री, निवडणुकीसाठी ठोकला शड्डू

कागलमधील घाटगे-मुश्रीफ लढतीत तिसऱ्या भिडूची एंट्री, निवडणुकीसाठी ठोकला शड्डू
 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागल विधानसभा मतदारसंघात लक्षवेधी घडामोडी घडत आहेत. पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाडगे यांच्यात सरळ लढत होणार असे चित्र होते. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या दोघांचे टेन्शन वाढवले आहे. कागल मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटना निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केलेले समरजीत घाटगे यांनी नुकतीच माजी खासदार राजू शेट्टी यांची भेट घेतली होती. त्यानंतर दोनच दिवसात शेट्टी यांनी कागलमधून उमेदवार देणार असल्याची घोषणा केल्यानंतर या भेटी मागचे तर्क वितर्क लढवले जात आहेत.

राजू शेट्टी यांनी नुकताच कागल विधानसभा मतदारसंघातील गोरंबे येथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. राजू शेट्टी म्हणाले, कागल विधानसभा मतदारसंघात सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणाच्या प्रतिनिधीची गरज आहे. विधानसभेत आपल्या हक्काचा प्रतिनिधी हवा. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकत्यांनी मागे न राहता कागल विधानसभा लढ़विण्यासाठी सज्ज व्हावे. यासाठी संपूर्ण ताकद आपल्या उमेदवाराच्या पाठीशी लावू.


स्वाभिमानीची ताकद किती?

कागल विधानसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद पुरेशी नसली तरी त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. या मतदारसंघातील 127 गावात शेतकरी संघटनेतील जुने कार्यकर्ता आणि शेतीची जाण असलेला शेतकरी शेट्टी यांच्यासोबत आहेत.

स्वाभिमानी आंदोलन करणार

कागल मतदारसंघात माजी खासदार संजय मंडलिक, मंत्री हसन मुश्रीफ, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांचे साखर कारखाने आहेत. त्यामुळे स्वाभिमानीने या जागेवर आपली पकड मजबूत ठेवण्यासाठी डाव टाकला आहे.मागील हप्त्यातील पैसे देण्यात कारखाने अद्यापही मागे असल्याने या विरोधात आवाज उठवण्यासाठी शेट्टी यांनी देखील रणशिंग फुंकण्याची तयारी ठेवली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.