Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मिरा रोड येथे प्रेमी युगलाकडून पैसे उकळणाऱ्या पोलिसाला घडली अद्दल

मिरा रोड येथे प्रेमी युगलाकडून पैसे उकळणाऱ्या पोलिसाला घडली अद्दल
 

प्रेमी युगलाकडून पैसे उकळल्याप्रकरणी मिरा भाईंदर-वसई विरार  पोलिसांनी एका पोलीस कॉन्स्टेबलला निलंबित केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रेमी युगल मिरा रोड येथे गप्पा मारत बसलं होतं. यावेळी त्याठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल सुर्यकांत केंद्रे आला होता. केंद्र मिरा रोड पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्यावर आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सेक्युरिटी फॉर्सचा गार्ड गोकुळ पुर्हे याने मिरा रोडवरील बेव्हरली पार्क भागात एल. आर. तिवारी इंजिनिअर कॉलेज येथे असलेल्या प्रेमी युगलांना पकडले होते. त्यानंतर पुर्हे याने केंद्रे याला याची माहिती दिली. केंद्र घटनास्थळी आला. यावेळी केंद्रेने जोडप्याला धमकावलं. सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह वर्तन केल्याचं म्हणत त्याने पैशाची मागणी केली.

केंद्रेने प्रेमी युगलाविरोधात गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या प्रेमी युगलाने पुर्हेच्या डिजिटल वॉलेटवर तब्बल १९ हजार रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर याप्रकरणी प्रेमी युगलाने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला होता.

तक्रार दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी धीरज कोली यांनी याप्रकरणी तपासाला सुरुवात केली. प्रेमी युगलाने केलेले आरोप कोली यांना सत्य आढळून आले. कोली यांनी याप्रकरणी डीसीपी प्रकाश गायकवाड यांच्याकडे रिपोर्ट सादर केला.  त्यानंतर गायकवाड यांनी केंद्र याला निलंबित केले असून विभागा अंतर्गत चौकशी सुरु केली आहे. तसेच, गार्ड पुर्हे याला कर्तव्यावरून कार्यमुक्त करण्यात आले असून त्याला एमएमएफ मुख्यालयात परत पाठवण्यात आले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.