ज्या घरातून हकललं, तोच बंगला घेतला विकत अक्षय कुमारने!
अक्षय कुमार बॉलीवूडचा सुपरस्टार आहे. अक्षयच्या नावावर एकापेक्षा एक शानदार चित्रपट केले आहेत. अक्षय आज टॉपचा अभिनेता आहे. अक्षयकडे आज कोटी संपत्तीचा मालक आहे. पण, अक्षय आज ज्या शिखरावर आहे, तिथे पोहोचण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावं लागलं. अक्षयने जेव्हा चित्रपटामध्ये काम शोधत होता, तेव्हा त्याच्याकडे फोटोशूट करायलादेखील पैसे नव्हते.
एका फोटोग्राफरकडे अक्षयने असिस्टेंट म्हणून यासाठी काम केलं की, त्याला मिळालेल्या पैशातून फोटोशूट करता येईल. फोटोशूटसाठी त्या फोटोग्राफरसोबत अक्षय कुमार फोटोशूटसाठी जुहूच्या एका बंगल्यावर पोहोचला. पण, तेथील गार्डने त्यांना बाहेरूनचं हाकलून दिले होते. पण, जेव्हा त्याच्याकडे पैसे आले तेव्हा त्याने तोच बंगला विकत घेतला. एका शोमध्ये त्याने ही घटना बोलून दाखवली होती.
शानदार अभिनयाने अक्षय कुमारने जिंकली मने
जवळपास ३२ वर्षात बॉलीवूडमध्ये अनेक हिट चित्रपट देणारे खिलाडी कुमार आपला ५७ वा वाढदिवस साजरा करत आहे. दमदार परफॉर्मन्स दिल्यानंतर आजदेखील वयाची ६० गाठत येत असतानाही तो अद्यापही अनेक चित्रपटात काम करताना दिसत आहे.
शानदार घर अन् सुंदर बाग
अक्षय कुमार-ट्विंकल खन्ना आणि दोन्ही मुले आरव-नितारा सोबत अंधेरी वेस्टच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये राहतो. जुहूतील सी-फेसिंग घराचे इंटीरियर ट्विंकल खन्नाने स्वत: डिझाईन केलं आहे. ग्राऊंड फ्लोरवर लिव्हिंग एरिया, डायनिंग रूम, किचन, होम थिएटर आणि अक्षयचा क्लोजेट आहे. फर्स्ट फ्लोरवर बेडरूम, पँट्री, ट्विंकलचे ऑफिस आणि बाल्कनी आहे.
तिने आपल्या घराला खूप सुंदर सजवलं आहे. अक्षय कुमारने काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. यामध्ये मिरर गेटनंतर त्या घराचे खूप सुंदर लिव्हिंग रूम आहे. लिव्हिंग एरिया बाहेर भगवान गणेशाची मूर्ती आहे, आत हनुमानजी देखील आहेत. बेज कलर सोफा आणि वेगवेगळ्या प्रकारचे पेंटिंगसोबत डेकोरेट आयटमनी रूमला सजवण्यात आलं आहे.ट्विंकल खन्नाला पुस्तके वाटायला आवडता. तिच्या ऑफिसमध्ये एक लायब्ररीदेखील आहे. पेंटिंग आणि डेकोरेटिव्ह आयटमने हा एरिया सुंदर सजवण्यात आला आहे. ट्विंकल खन्नाने आपले घर ऑर्गेनिक थीमवर सजवलं आहे. वेगवेगळ्या डिझाईनचे सोफे घराला युनिक आणि लक्झरियस लूक देत आहेत. बेज कलरचा सोफा, व्हाईट शेड सोफा आहे. याशिवाय, ग्रे शेड्स, मॅचिंग प्रिंट्स आणि कर्टेन्स लावण्यात आले आहेत. पेटिंग आणि युनिक सजावटी आयटम खूप लक्षवेधी ठरतात. शानदार झुंबर, येलो लाईट आणि भिंतीवर व्हाईट पेंट परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. जिथे फर्निचर देखील व्हाईट आणि येलो कलरमध्ये आहे. अक्षय कुमारच्या घरात मास्टर बेडरूम घरातील सर्वात सुंदर एरिया आहे. अक्षयच्या घरातील बाग देखील सुंदर आहे. या गार्डनमध्ये एक आंब्याचे झाडदेखील आहे. बागेत भाजी, फळे तोडतानाचे फोटो ट्विंकल नेहमी शेअर करते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.