Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ब्रेकिंग न्यूज!मुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे पुण्यात इमर्जन्सी लॅडिंग

ब्रेकिंग न्यूज!मुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे पुण्यात इमर्जन्सी लॅडिंग
 

पुणे :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचे पुण्याच्या लांडेवाडी परिसरात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे सहकुटुंब दर्शनासाठी जाणार आहेत. मात्र खराब हवामानामुळे त्यांचे हेलिकॉप्टर लांडेवाडी या भागात उतरवण्यात आले. खराब हवामानाचा फटका एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याला बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या भीमाशंकर परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये धुके पाहायला मिळत आहे. याच खराब हवामानाचा फटका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही बसला आहे. भीमाशंकरला खराब हवामान असल्यामुळे मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर लांडेवाडीत उतरवण्यात आले आहे. शासकीय प्रोटोकॉलनुसार, एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर भीमाशंकर या ठिकाणी उतरवण्यात येणार होते. मात्र भिमाशंकरमध्ये धुकं, पाऊस असे खराब हवामान आहे. या हवामानामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी उतरविण्यात आले.

श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे गर्दी

एकनाथ शिंदे हे श्रावण महिन्यातील सोमवारी श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी येतात. यंदाही अखेरच्या श्रावण सोमवारी एकनाथ शिंदे हे दर्शनासाठी गेले आहेत. दरम्यान श्रावणातील शेवटचा सोमवार असल्याने श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे. हर हर महादेवचा जयघोष करत भाविक रांगेत उभे आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.