Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तुमच्या घरात सुद्धा आहे का बीफवालं तूप? शुद्ध आहे हे कसं ओळखायचं?

तुमच्या घरात सुद्धा आहे का बीफवालं तूप? शुद्ध आहे हे कसं ओळखायचं?
 

आंध्र प्रदेशातल्या तिरुपतीमधल्या व्यंकटेश्वर देवस्थानात दिल्या जाणाऱ्या लाडूच्या प्रसादात वापरल्या जाणाऱ्या तुपात फॉरीन फॅट्स आढळल्याने गदारोळ उडाला आहे. गेल्या आठवड्यात सुरू झालेलं हे प्रकरण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे.

कथितरीत्या भेसळयुक्त तुपाचा पुरवठा केल्याप्रकरणी तमिळनाडूस्थित एआर डेअरी फूड प्रायव्हेट लिमिटेडविरुद्ध तिरुमला तिरुपती देवस्थानने (टीटीडी) कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. या कंपनीने तूप अहवालावर प्रश्न उपस्थित केले आहेत. या पार्श्वभूमीवर अनेकांच्या मनात घरगुती वापरातल्या तुपाबाबत शंकाकुशंका निर्माण होत आहेत.

घरात वापरल्या जाणाऱ्या तुपातसुद्धा भेसळ असू शकते. तुपाची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही काही सोप्या पद्धतींचा अवलंब करू शकता. शुद्ध तुपाचा रंग सोनेरी असतो. तुम्ही विकत घेतलेल्या तुपाचा रंग पिवळा किंवा पांढरा असेल तर त्यात भेसळ असण्याची शक्यता आहे. शुद्ध तुपाचा गंध चांगला असतो. तुम्ही विकत घेतलेल्या तुपाला विचित्र वास येत असेल तर त्यात भेसळ असू शकते. शुद्ध तूप रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास ते कडक होऊन त्यात क्रिस्टल्स तयार होतात. जर तुम्ही वापरत असलेलं तूप थंड झाल्यावरही गोठत नसेल तर त्यात भेसळ असण्याची शक्यता आहे.

घरच्या घरी तुपाची शुद्धता तपासायची असेल तर एका कढईत मंद आचेवर थोडं तूप गरम करा. तूप शुद्ध असेल तर ते हळूहळू वितळेल आणि त्याला फेसही येणार नाही. तुपात भेसळ असेल तर ते लवकर वितळेल आणि त्याला फेस येईल.

तुपामध्ये भेसळ का केली जाते?
तुपात भेसळ होण्याची अनेक कारणं असू शकतात. प्राणिजन्य फॅट्स मिसळून भेसळ केलेल्या तुपाच्या तुलनेत शुद्ध तुपाची किंमत जास्त असते. त्यामुळे उत्पादन खर्च कमी करण्यासाठी काही जण तुपात भेसळ करतात. भेसळयुक्त तूप विकून व्यापारी अधिक नफा कमावू शकतात. बहुतांश जणांना भेसळयुक्त तुपाची माहिती नसल्याने ते भेसळयुक्त तूप खरेदी करतात.

तिरुपती मंदिराबद्दल सांगायचं झाल्यास, तिथे प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूच्या चवीबद्दल अनेक तक्रारी आल्या होत्या. याबाबत 23 जुलै रोजी विश्लेषण करण्यात आलं. प्रसादाच्या लाडूमध्ये नारळ, जवस, मोहरी आणि सरकी यांसारख्या वनस्पतिजन्य फॅट्ससह प्राणिजन्य फॅट्सचाही समावेश असल्याचं विश्लेषणात समोर आलं होतं.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.