उद्योग मंत्री उदय सामंत यांचा सांगली जिल्हा दौरा
सांगली दि. 20 : राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे शनिवार, दि. 21 सप्टेंबर 2024 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार, दि. 21 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 1.10 वाजता पोलीस परेड ग्राऊंड पाषाण, पुणे येथून कवलापूर हेलिपॅड, सांगली कडे प्रयाण. दुपारी 2.10 वाजता कवलापूर हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने राजमती ग्राऊंड, नेमिनाथनगर, विश्रामबाग, सांगली कडे प्रयाण. दुपारी 2.30 वाजता राजमती ग्राऊंड नेमिनाथनगर सांगली येथे टेलर्स वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य आयोजित इंडियाज फस्ट टेलर्स एक्स्पो-2024 उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 3.30 वाजता नेमिनाथनगर, सांगली येथून मोटारीने कवलापूर हेलिपॅड कडे प्रयाण. दुपारी 3.45 वाजता कवलापूर हेलिपॅड येथे आगमन व हेलिकॉप्टरने पुणे विमानतळाकडे प्रयाण.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.