गझल मंथन साहित्य संस्थेचा उत्कृष्ट मराठी गझलसंग्रह पुरस्कार वैभव जोशी यांच्या "काळ सरकत राहिला" या गझल संग्रहाला जाहीर
ठाणे, दि. ११ गझल मंथन साहित्य संस्थेतर्फे दिला जाणारा उत्कृष्ट गझलसंग्रह पुरस्कार नामांकित गझलकार वैभव जोशी यांच्या 'काळ सरकत राहिला' या गझलसंग्रहाला जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण दि. २९ सप्टेंबर रोजी ठाणे येथे होत असलेल्या गझल संमेलनात होणार आहे.
गझल मंथन साहित्य संस्थेतर्फे या वर्षापासून उत्कृष्ट गझलसंग्रह पुरस्कार सुरू करण्यात आला. गझलकार वैभव जोशी हे पहिल्या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. या पुरस्काराची घोषणा संस्थेचे मुख्य कार्यालय कोरपना जि.चंद्रपूर येथे संस्थेचे सचिव जयवंत वानखडे यांनी नुकतीच केली. यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष प्रशांत रामगिरवार, कार्यकारी मंडळ सदस्य प्रा. अनुप रणदिवे, महेश गारघाटे , निलेश भुडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
या पुरस्कारासाठी दि. १ जानेवारी २०२२ ते दि. ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रकाशित झालेले गझलसंग्रह गझल मंथन साहित्य संस्थेच्या वतीने मागवण्यात आले होते. या पुरस्काराकरिता मोठ्या संख्येने गझलसंग्रह आल्यामुळे स्पर्धेत अतिशय चुरस निर्माण झाली होती. अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत गझलकार श्री. वैभव जोशी यांच्या "काळ सरकत राहिला" या गझल संग्रहाने गझल मंथन साहित्य संस्थेच्या पहिल्या उत्कृष्ट मराठी गझलसंग्रह पुरस्काराचा मान पटकावला आहे. ११ हजार १११ रुपये (धनादेश), आकर्षक सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते गझल मंथन साहित्य संस्थेच्या दि. २९ सप्टेंबर रोजी वारकरी भवन, पहिला माळा, राम मंदिर रोड, ठाणे (पश्चिम) येथे सकाळी ९ वाजता होणाऱ्या एक दिवशीय गझल संमेलनात केले जाणार आहे. गझल रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे, उपाध्यक्ष वसुदेव गुमटकर, सचिव जयवंत वानखडे, प्रसिद्धी प्रमुख भरत माळी, ठाणे जिल्हाध्यक्षा मानसी जोशी आणि ठाणे जिल्हा व कोकण विभाग कार्यकारिणीने केले आहे.
_______________________
सौ.प्रणाली म्हात्रे ,मुंबई
जिल्हाध्यक्ष गझल मंथ साहित्य संस्था
मो. 8779879446
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.